मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Milk Price Hike : दुग्धक्रांतीनंतरही भारतात दूधाची टंचाई, सामान्यांचा दरवाढीचा फटका; काय आहेत कारणं?

Milk Price Hike : दुग्धक्रांतीनंतरही भारतात दूधाची टंचाई, सामान्यांचा दरवाढीचा फटका; काय आहेत कारणं?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 19, 2022 12:23 PM IST

Milk Price Hike In India : गेल्या काही दिवसांपासून दूधाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं आता भारतात दूधाची टंचाई निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Milk Price Hike In India
Milk Price Hike In India (HT)

Milk Price Hike In India : गेल्या काही दिवसांपासून भारतात दूधाच्या दरात मोठी वाढ होत असल्यानं आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना दूधाच्या दरानं पोळलं आहे. भारतानं दुग्धक्रांती केली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून देशात दूधाची मोटी टंचाई निर्माण होत असून परिणामी त्याचे दर वाढत आहे. ही दरवाढ येत्या काही महिन्यातही जारी राहण्याची शक्यता असल्यानं आता चिंता वाढली आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात दूधाचा पुरवठा कमी झाल्यानं सातत्यानं दरवाढ होताना दिसत आहे. त्यामुळं यामागे काय नेमकी कारणं आहेत, जाणून घेऊयात.

अतिवृष्टीमुळं चाऱ्याची कमी...

गेल्या दोन वर्षांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर्षीही पंजाब, हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाल्यानं पिकं करपली. त्यामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवला आहे. परिणामी जनावरांनी आवश्यक पोषकतत्व नसलेलं खाद्य न मिळाल्यानं दूधाचं उत्पादन कमी होत आहे.

जनावरांवर लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव...

देशातील अनेक भागांमध्ये जनावरांना लम्पी आजाराचं संसर्ग होत असून या आजारामुळं आतापर्यंत अनेक जनावरं दगावलेली आहेत. लम्पी आजारानं देशातील अनेक राज्यातल्या जनावरांना बाधित केल्यानं त्याचा विपरित परिणाम दूध उत्पादन आणि त्याच्या संकलनावर होत आहे. याशिवाय लम्पी आजारामुळं त्याचा जनावरांच्या आठवडी बाजारावरही परिणाम झाला आहे. त्यामुळं देशात दुधाची टंचाई होणार असल्याचं बोललं जात आहे.

पुरवठा कमी पण मागणी प्रचंड वाढली...

भारतासह जगभरात दूधाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्याच्या काळात दुग्धव्यवसाय संकटात सापडलेला असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत दूधाच्या मागणीत सात ते आठ टक्क्याची वाढ झाली आहे. त्यामुळं पुरवठा कमी असल्यानं त्याचा दूधाच्या दरावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळं आता आगामी काही महिन्यांत दूधाच्या दरामध्ये सातत्यानं वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग