मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सर्व विद्यापीठांतील कुलगुरुंना राजीनामा देण्याचे आदेश; कोश्यारींनंतर ‘हे’ राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात

सर्व विद्यापीठांतील कुलगुरुंना राजीनामा देण्याचे आदेश; कोश्यारींनंतर ‘हे’ राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात

Oct 24, 2022, 03:11 PM IST

    • Governor vs Government : राज्यातील विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना कुलगुरू केलं जात असल्याचा आरोप सीपीआयचे नेते सिताराम येचूरींनी केला आहे.
Sitaram Yechury vs Governor Arif Mohammad Khan (HT)

Governor vs Government : राज्यातील विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना कुलगुरू केलं जात असल्याचा आरोप सीपीआयचे नेते सिताराम येचूरींनी केला आहे.

    • Governor vs Government : राज्यातील विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना कुलगुरू केलं जात असल्याचा आरोप सीपीआयचे नेते सिताराम येचूरींनी केला आहे.

Sitaram Yechury vs Governor Arif Mohammad Khan : गेल्या काही महिन्यांपासून केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केरळ सरकारमध्ये मोठा राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच केरळचे मुख्यमंत्री पीनरई विजयन आणि राज्यपाल खान यांनी एकमेकांवर आरोप केले होते. त्यानतंर आता कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि खासदार सिताराम येचूरी यांनी राज्यपाल खान यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना कुलगुरू केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळं आता महाराष्ट्र, बंगाल दिल्ली आणि झारखंडनंतर केरळात राज्यपालांचे निर्णय वादात सापडण्याची चिन्ह आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Karnataka Sex Scandal : क्लिप व्हायरल झाल्यानंतर महिला सोडत आहेत घर, पतीच विचारत आहेत प्रज्वल रेवण्णाशी तुझा…”,

ICSE ISC Result: सीआयएससीई बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीचं मारली बाजी!

10th Passed Job: दहावी उतीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख!

DK Shivkumar Viral Video: खांद्यावर हात ठेवल्याने डीके शिवकुमार संतापले, सगळ्यांसमोर कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली!

मिळालेल्या माहितीनुसार, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळातील नऊ विद्यापीठांच्या कुलगुरुंचा राजीनामा मागितला आहे. त्यानंतर विद्यापीठांच्या कुलगुरुंनी राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात केरळच्या हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर आता सीपीआयचे नेते सिताराम येचूरी यांनी खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला राज्यपाल यांनी घेतलेल्या निर्णयांनी धक्का बसला असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना कुलगुरू करू पाहत आहेत, कुलगुरुंचा राजीनामा घेण्याचा अधिकार त्यांना नसून हा राजकीय निर्णय आहे, ज्यामुळं केरळातील विद्यापीठांमध्ये हिंदुत्ववादी लोकांचा भरणा करून शैक्षणिक संस्थांना नष्ट करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप येचूरींनी राज्यपाल खान यांच्यावर केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी केरळ विधानसभेनं पारित केलेल्या विधेयकांवर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी स्वाक्षरी न केल्यामुळं मोठा राजकीय वाद झाला होता. मुख्यमंत्री पीनरई विजयन आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राज्यपालांविरोधात उघडपणे आरोप केले होते. त्याला राज्यपाल खान यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता केरळात पुन्हा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.