मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  DK Shivkumar Viral Video: खांद्यावर हात ठेवल्याने डीके शिवकुमार संतापले, सगळ्यांसमोर कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली!

DK Shivkumar Viral Video: खांद्यावर हात ठेवल्याने डीके शिवकुमार संतापले, सगळ्यांसमोर कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली!

May 06, 2024, 01:59 PM IST

    • DK Shivakumar slaps Allauddin Maniar: कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी मनपा सदस्य अलाउद्दीन मणियार यांच्या कानशिलात लगावली!
कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

DK Shivakumar slaps Allauddin Maniar: कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी मनपा सदस्य अलाउद्दीन मणियार यांच्या कानशिलात लगावली!

    • DK Shivakumar slaps Allauddin Maniar: कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी मनपा सदस्य अलाउद्दीन मणियार यांच्या कानशिलात लगावली!

Viral Video: कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी खांद्यावर हात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून विरोधकही शिवकुमार यांच्या वागणुकीकडे बोट दाखवत आहेत. कर्नाटकात डीके शिवकुमार हे 'डीके' म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवकुमार हे शनिवारी हावेरी येथील सावनूर येथे पक्षाच्या प्रचारासाठी गेले. शिवकुमार एसयूव्हीतून बाहेर येताच एका कार्यकत्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. यामुळे शिवकुमार संतापले आणि त्यांनी संबंधित कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मनपा सदस्य अलाउद्दीन मणियार यांनी काँग्रेस नेते शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे दिसत आहे. मात्र, ही गोष्ट शिवकुमार यांना खटकली. त्यांनी कोणताही विचार न करता कार्यकर्त्यांसमोर मणियार यांच्या कानशिलात लगावली. विचित्र गोष्ट म्हणजे, या घटनेनंतरही मणियार हासताना दिसत आहेत. मणियार यांना सुरक्षा कर्मचारी आणि शिवकुमार यांच्या समर्थकांनी ढकलून दिले.

Lok Sabha Election 2024: २५६१ मतदान केंद्र, २३.७२ लाख मतदार आणि चोख बंदोबस्त; बारामती लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान!

६१ वर्षीय काँग्रेस नेते शिवकुमार स्पष्टपणे नाराज दिसत होते. त्यांनी मणियार यांना तिथून दूर जाण्याचा इशारा केला. त्याला मागे ढकलण्यात आले. यानंतर तो इतर समर्थकांमध्ये सामील झाला. नंतर शिवकुमार पुढे निघून गेले. शिवकुमार हे पक्षाच्या उमेदवार विनोदा आसुती यांच्या प्रचारासाठी हावेरी येथे पोहोचले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

ED raid : झारखंडमध्ये ईडीच्या हाती लागला नोटांचा डोंगर! नोकराच्या घरात कुबेरचा खजिना; काँग्रेस नेत्याच्या अडचणीत वाढ

कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा असून राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. १४ जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान झाले असून उर्वरित १४ जागांसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर, ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि जेडीएस या राज्यातील तत्कालीन आघाडीतील भागीदारांना प्रत्येकी एकच जागा जिंकता आली. यावेळी भाजप आणि जेडीएसमध्ये युती आहे. भाजप २५ जागांवर तर जेडीएस तीन जागांवर निवडणूक लढवत आहे.

जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप आहेत, त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागत आहेत. सर्वसामान्यांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर परदेशात असलेल्या रेवन्ना यांना पक्षाने निलंबित केले. प्रज्वल रेवन्ना यांचे काका एचडी कुमारस्वामी यांनी डीके शिवकुमारवर व्हिडिओ सार्वजनिकपणे प्रसारित करण्याचा कट रचल्याचा आणि त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केल्याचा आरोप केला.

विभाग

पुढील बातम्या