मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Uddhav Thackeray : भाजपाचा विजय झाल्यास चीनमध्ये फटाके फुटतील, उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांना टोला

Uddhav Thackeray : भाजपाचा विजय झाल्यास चीनमध्ये फटाके फुटतील, उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांना टोला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 06, 2024 12:13 AM IST

Uddhav Thackeray On Modi : उद्धव ठाकरेंनी दावा केला की, जर भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली तर चीनमध्ये फटाके फुटतील, कारण नवी दिल्लीत एक कमजोर सरकार सत्तेत येईल.

उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांना टोला
उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांना टोला

शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, भलेही भाजपने त्यांच्यासाठी दरवाजे उघडले तरी ते परत एनडीएमध्ये येणार नाहीत. तसेच त्यांनी सत्ताधारी पक्षावर विश्वासघाताने २०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा आरोप केला. अलिबाग येथील रॅलीत बोलताना उद्धव ठाकरेंनी दावा केला की, जर भाजपने लोकसभा निवडणूक जिंकली तर चीनमध्ये फटाके फुटतील, कारण नवी दिल्लीत एक कमजोर सरकार सत्तेत येईल.

ट्रेंडिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या त्या वक्तव्याचा निषेध केला त्यामध्ये म्हटले होते की, पाकिस्तानची इच्छा आहे की, राहुल गांधींनी भारताचे पंतप्रधान बनावे. उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात भाजप पाकिस्तानच्या नावावर भीती पसरवण्याचे काम करते. पुंछ दहशतवादी हल्ल्यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तिकडे फिरकणार नाहीत, पण उद्धव ठाकरेंना उध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्रात येतील. अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात मतदानाआधी शनिवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या ताफ्याला निशाणा बनवत हल्ला केला. यात एक जवान शहीद झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत.

१० वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात पण काश्मीरमध्ये अजूनही दहशतवादी हल्ले होतच आहेत. तुमच्या नादनपणामुळे जवानांनी जीव गमावला. सत्यपाल मलिक यांनी तुम्हाला उघड पाडलं. याबद्दल का बोलत नाहीत.'महागाई व बेरोजगारीवर का बोलत नाहीत, असा सवालही ठाकरेंनी मोदींना केला. २०१४ साली पंतप्रधान पदासाठी भाजपकडून पंतप्रधान पदासाठी कोण असावं, असं राजनाथ सिंह यांनी मला विचारलं,तेव्हा मी तुमचं नाव दिलं, हे माझं पाप आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खंत व्यक्त केली.

तुम्ही आमचा धनुष्यबाण चोरुन महाराष्ट्राच्या अस्मितेवर वार केला. पवित्र भगव्याला तुम्ही कलंक लावला. धनुष्यबाण गद्दाराला दिला,आता तुमची पंतप्रधानपदाची खुर्ची काढून घेतल्याशिवाय महाराष्ट्र गप्प बसणार नाही. महाराष्ट्राच्या तोंडातील घास काढून तो गुजरातला नेत असाल तर आम्ही तो हात कापून टाकल्याशिवाय राहणार नाही.

भारतीय जनता पार्टीला राजकारणात मुलंच झाली नाहीत -

उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही दुसऱ्यांच्या गळ्यातील मंगळसुत्राकडे लक्ष देता, मग पीएम केअर फंडामध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत का अवाक्षर काढत नाहीत. ज्यांना मुलं जास्त त्यांना संपत्ती वाटून टाकली जाणार, असे सर्वांना भीती घालता. आता राजकारणामध्ये भाजपाला मुलं होत नाहीत, त्याला मी काय करणार. मी त्यांना भाकड जनता पार्टी यासाठी म्हणतो की,भारतीय जनता पक्षाला राजकारणात मुलंच झाली नाहीत. कारण त्यांना आमची मुलं कडेवर घेऊन फिरावे लागत आहे,अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली.

 

WhatsApp channel