मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मेलबर्नमध्येही ‘बाळासाहेबांची शिवसेना’ झळकली; विराटच्या खेळीनंतर मुख्यमंत्र्यांची ठाण्यात फटकेबाजी!

मेलबर्नमध्येही ‘बाळासाहेबांची शिवसेना’ झळकली; विराटच्या खेळीनंतर मुख्यमंत्र्यांची ठाण्यात फटकेबाजी!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 24, 2022 11:49 AM IST

CM Eknath Shinde : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला मोठं यश मिळाल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray
CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray (HT)

CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray : टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारतानं अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानला धूळ चारली आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात विराट कोहलीच्या खेळीनं भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला आहे. परंतु याच विजयाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यात दिवाळी पहाट या कार्यक्रमाला हजेरी लावत विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. टीम इंडियानं एक मॅच जिंकली परंतु आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वीच अत्यंत चुरशीचा सामना जिंकल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

दिवाळी सणाच्या निमित्तानं ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उपस्थितांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली आहे. ऑस्ट्रेलियातील एमसीजीच्या क्रिकेट मैदानात सामन्यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर फडकावण्यात आलेत, असं शिंदे म्हणाले तेव्हा त्यांना कार्यक्रमात उपस्थितांनी मोठी दाद दिली. भारतानं काल पाकिस्तानला हरवलं, परंतु साडेतीन महिन्यांपूर्वी आम्हीही असाच चुरशीचा सामना जिंकलाय, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

ग्रांमपंचायत निकालातील यश हे परिवर्तनाची नांदी- मुख्यमंत्री

काही दिवसांपूर्वीच राज्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यात भाजपला ३९७ आणि शिंदे गटाला २९८ जागा मिळाल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परिवर्तनाची नांदी असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून सर्वांनी पर्यावरण पूरक आणि प्रदूषण केल्याशिवाय दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

IPL_Entry_Point