मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: तरुणीला ‘आयटम’ म्हणणं पडलं महागात; टवाळखोर तरुणाला दीड वर्षांची शिक्षा

Mumbai: तरुणीला ‘आयटम’ म्हणणं पडलं महागात; टवाळखोर तरुणाला दीड वर्षांची शिक्षा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 24, 2022 11:02 AM IST

man jailed for calling girl item: तरुणीला ‘आयटम’ म्हणणं हा गुन्हा लैंगिक शोषण मानलं जाईल, असं निकाल देताना कोर्टानं म्हटलं आहे.

Mumbai Crime News Marathi
Mumbai Crime News Marathi (HT)

man jailed for calling girl item: एका तरुणीला आयटम म्हटल्याच्या आरोपाखाली आरोपी तरुणाला न्यायालयानं तब्बल दीड वर्षांची शिक्षा सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी तरुणानं आयटम म्हणत विनयभंग केल्याची तक्रार करत पीडित तरुणीनं न्यायालयात धाव घेतली होती. त्याची सुनावणी करताना कोर्टानं मुलींना आयटम म्हणणं हा गुन्हा लैंगिक शोषण मानलं जाईल, असं म्हटलं आहे. मुंबईतील १६ वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कोर्टानं २६ वर्षीय एका व्यावसायिकाला दोषी ठरवलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ साली आरोपी तरुणानं पीडित मुलीचे केस ओढत तिला 'काय आयटम, कुठे चाललीस' असं म्हटलं होतं. त्यानंतर आरोपीनं एक महिना मुलीचा पाठलाग केला होता. याशिवाय मुलगी शाळेत जात असताना अनेकदा आरोपीनं तिला लैंगिक शोषणाच्या हेतूनं अश्लिल टिप्पणी केली होती. त्यानंतर पीडित मुलीनं याबाबतची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर आरोपीविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आता न्यायालयानं या प्रकरणात निकाल दिला आहे.

महिलांना समाजात अन्यायकारक वागणूक मिळू नये, त्यांना अशा गोष्टींपासून वाचवण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. आरोपींना धडा शिकवल्याशिवाय ते वठणीवर येणार नाहीत, असं कोर्टात सुनावणीवेळी मुंबईच्या न्यायालयातील विशेष न्यायाधीश एसजे अन्सारी यांनी म्हटलं आहे. आरोपी तरुणाला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळं आता न्यायालयाचा हा निर्णय महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग