मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kinwat Crime News : कापसाच्या पिकात गांजाची लागवड, पोलिसांचा शेतात छापा; तीन शेतकऱ्यांना अटक

Kinwat Crime News : कापसाच्या पिकात गांजाची लागवड, पोलिसांचा शेतात छापा; तीन शेतकऱ्यांना अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 24, 2022 11:15 AM IST

Nanded Crime News Marathi : विनापरवाना शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती किनवट पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शेतकऱ्यांच्या शेतात छापेमारी करून अडीच लाखांचा गांजा जप्त केला आहे.

Nanded Crime News Marathi
Nanded Crime News Marathi (HT_PRINT)

Kinwat Nanded Crime News Marathi : कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातून समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर किनवट पोलिसांनी आरोपी शेतकऱ्यांच्या शेतात छापेमारी करत तीन शेतकऱ्यांना अटक केली असून अडीच लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. ऐन दिवाळीतच ही घटना समोर आल्यानं नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चंद्रपूर गावाच्या शिवारात तीन शेतकऱ्यांनी गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकनं काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपी शेतकऱ्यांच्या शेतात छापा मारून ५२ किलो वजनाची गांजाची झाडं जप्त केली असून तिन्ही शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल असून त्यांना अटक केली आहे.

दिवाळीतच किनवटमध्ये छापेमारीनं खळबळ...

संपूर्ण देशासह राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दिवाळी साजरी केली जात असतानाच किनवटमध्ये तीन शेतकऱ्यांच्या शेतात पोलिसांनी छापेमारी केल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे. याशिवाय पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेतातून अडीच लाखांचा गांजा जप्त केल्यानं तालुक्यातील गांजा लागवडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील एका गावातील शेतात छापेमारी करत लाखोंचा गांजा जप्त केला होता. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील या कारवाईनं मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग