मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jerusalem terror attack : दहशतवादी हल्ल्याने जेरुसलेम हादरले ! अंधाधुंद गोळीबारात ८ नागरिक ठार

Jerusalem terror attack : दहशतवादी हल्ल्याने जेरुसलेम हादरले ! अंधाधुंद गोळीबारात ८ नागरिक ठार

Jan 28, 2023, 07:53 AM IST

    • Jerusalem terror attack : इस्राइलची राजधानीचे शहर असलेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात ८ नागरिक ठार झाले. येथील नेवे याकोव्ह स्ट्रीटवरील सिनेगॉगजवळ दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. 
Jerusalem terror attack

Jerusalem terror attack : इस्राइलची राजधानीचे शहर असलेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात ८ नागरिक ठार झाले. येथील नेवे याकोव्ह स्ट्रीटवरील सिनेगॉगजवळ दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.

    • Jerusalem terror attack : इस्राइलची राजधानीचे शहर असलेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात ८ नागरिक ठार झाले. येथील नेवे याकोव्ह स्ट्रीटवरील सिनेगॉगजवळ दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. 

जेरुसलेम : इस्राइलची राजधानीचे शहर असलेले जेरुसलेम प्राणघातक दहशतवादी हल्ल्याने हादरले. येथील नेवे याकोव्ह स्ट्रीटवरील सिनेगॉगजवळ स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री ८.१५ च्या सुमारास दहशवाद्यांनीअंदाधुंद गोळीबार केला. यात ८ नागरिक ठार तर १० नागरिक जखमी झाले आहेत. हल्ला झाल्यानंतर पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून जखमी नागरिकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलने या हल्ल्याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral news : अन् जंगली हत्ती गावकऱ्यांसोबत चक्क क्रिकेट खेळू लागला…

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, थोडा ब्रेक घ्या अन् जाऊन पाहा, VIDEO व्हायरल

UP Mobile Blast News: ईअरफोन लावून बाईक चालवत होती महिला, तितक्यात मोबाईलचा स्फोट झाला अन्...

UP : उत्तर पत्रिकेत 'जय श्रीराम' आणि क्रिकेटपटूंची नावं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पास केलं; प्राध्यापकांची हकालपट्टी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याला पोलिसांनी ठार मारले आहे. गुरुवारी जेनिनच्या निर्वासित शिबिरात झालेल्या प्राणघातक संघर्षांनंतर ही घटना घडली. या घटनेत एका वृद्ध महिलेसह नऊ पॅलेस्टिनी नागरिक इस्रायली सैन्याने मारले होते.

सीएनएनच्या म्हणण्यानुसार, वेस्ट बँक शहरात झालेल्या हल्ल्यात इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची संख्या ही २९ वर गेली आहे. शिवाय, इस्रायलने गाझापट्टीवर दहशतवाद्यांच्या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून मध्य गाझा पट्टीमध्ये बॉम्बहल्ले देखील तीव्र केले आहेत. या हल्ल्यांमुळे हमास या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडेल असे वृत्त, द टाईम्स ऑफ इस्रायलने दिले आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) ने म्हटले आहे की, मध्य गाझामधील माघाझी निर्वासित शिबिरात रॉकेट तयार केले जातात. येथून हमासचे दहशतवादी इस्राइलवर हल्ले करत असतात. इस्राइलने मध्य गाझा येथे केलेल्या हल्यामुळे हमासच्या शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या प्रयत्नांना मोठी हानी पोहोचली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी जेरुसलेमच्या उत्तरेकडील ए-राम शहरात इस्रायली सैन्यासोबत झालेल्या संघर्षात एक पॅलेस्टिनी व्यक्ती ठार झाली, असे पीए आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

 

विभाग