मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खुशखबर.. येत्या १० वर्षात १०० चित्ते येणार भारतात, नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेशी करार

खुशखबर.. येत्या १० वर्षात १०० चित्ते येणार भारतात, नामिबियानंतर दक्षिण आफ्रिकेशी करार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2023 07:14 PM IST

South African cheetahs : नामिबियानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेसोबत प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत करार केला असून येत्या १० वर्षात १०० चित्ते भारतात आणले जाणार आहेत.

South African cheetahs
South African cheetahs

दक्षिण आफ्रिकेने १०० हून अधिक चित्ते हस्तांतरित करण्यासाठी भारतासोबत करार केला आहे.  गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून आठ चित्त्यांच्या आगमनानंतर १२ चित्यांची तुकडी पुढील महिन्यात भारतात पाठवली जाईल, असे पर्यावरण मंत्रालयाने सांगितले आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की पुढील आठ ते १० वर्षांसाठी, चित्तांची लोकसंख्या वाढवण्यासाठी दरवर्षी १२ चित्ते भारतात आणली जातील. 

१९५२ मध्ये चित्ता भारतातून नामशेष -

भारत एकेकाळी एशियाटिक चित्त्यांचे घर होते, परंतु १९५२ पर्यंत हा प्राणी नामशेष झाल्याचे घोषित केले गेले. शिकाऱ्यांकडून शिकार आणि कातड्यांचे संग्रह चित्ता नामशेष होण्याचे मुख्य कारण होते.

२०२० मध्ये हा प्राण्यांची पुन्हा पैदास आढवण्याच्या प्रयत्नांना वेग आला. जेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की आफ्रिकन चित्ताची एक वेगळी उपप्रजाती काळजीपूर्वक निवडलेल्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर देशात आणली जाऊ शकते.

यासाठी दक्षिण आफ्रिकेशी करारासाठी वाटाघाटी खूप दिवसांपासून सुरू होत्या, चित्त्यांची पहिली खेप ऑगस्टमध्ये भारतात येण्याची अपेक्षा होती. मात्र यावेळी ते क्वारंटाईनमध्ये राहत होते.

प्रिटोरिया विद्यापीठातील पशुवैद्यकीय वन्यजीव तज्ञ एड्रियन टॉर्डिफ यांनी सांगितले की, क्वारंटाईन मधील  चित्ते ठीक आहेत व चांगली एक्टीव्हीटी करत आहेत.

कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियन चित्ते -

कुनो नॅशनल पार्क, नवी दिल्लीच्या दक्षिणेस ३२० किलोमीटर (२०० मैल) अंतरावर असलेले वन्यजीव अभयारण्य असून नामिबियातून आणलेले चित्ते ठेवण्यात आले आहेत. येथे मुबलक शिकार आणि गवताळ प्रदेशात ते फिरू शकतात. 

 

 

IPL_Entry_Point

विभाग