मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amit Shah PC : चीनच्या दूतावासाकडून काँग्रेसनं पैसे घेतले; गृहमंत्री अमित शहांचा गंभीर आरोप

Amit Shah PC : चीनच्या दूतावासाकडून काँग्रेसनं पैसे घेतले; गृहमंत्री अमित शहांचा गंभीर आरोप

Dec 13, 2022, 01:01 PM IST

    • Amit Shah On Congress : राजीव गांधी फाऊंडेशनच्या माध्यमातून काँग्रेसनं चीनी सरकारकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
HM Amit Shah PC Today Live (HT)

Amit Shah On Congress : राजीव गांधी फाऊंडेशनच्या माध्यमातून काँग्रेसनं चीनी सरकारकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.

    • Amit Shah On Congress : राजीव गांधी फाऊंडेशनच्या माध्यमातून काँग्रेसनं चीनी सरकारकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.

HM Amit Shah PC Today Live : अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर चीनकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. गृहमंत्री शहांच्या आरोपांमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून काँग्रेस त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर; रामलल्ला दर्शन, शरयू पूजन, असा आहे संपूर्ण कार्यक्रम!

Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, तीन महिलांसह १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Monsoon Update : खुशखबर! यंदा मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, बरसणारही जोरदार ; ‘या’ दिवशी केरळात धडकणार

विटांची भिंत तोडून भरधाव कार घुसली घरात; ३ जण जखमी, कारचा चक्काचूर, पाहा Viral VIDEO

माध्यमांशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये आठ आणि नऊ डिसेंबरला भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीच्या घटनेमुळं प्रश्नोत्तरांच्या तासाला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आम्ही यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की या विषयावर संसदेत संरक्षणमंत्री राजनाथसिंह उत्तर देतील. परंतु २००५ आणि २००६ साली राजीव गांधी फाऊडेशनला चीनी दूतावासाकडून एक कोटी ३५ लाख रुपयांचा अनुदान मिळाला आहे. या फाऊंडेशनची नोंदणी सामाजिक कार्यांसाठी केलेली आहे, परंतु चीनकडून मिळालेल्या पैशांचा वापर भारत आणि चीन संबंधांसंदर्भातील शोधकार्यांसाठी वापरण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा करत अमित शहांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.

१९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धानंतर चीनने भारताची हजारो हेक्टर जमीन हडपली असून नेहरुंच्या चीनी पेमाखातर भारताला संयुक्त राष्ट्रांच्या स्थायी समितीचं सदस्यत्वही मिळालं नाही. ज्यावेळी गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य चीनी सैन्याशी भिडत होते त्यावेळी चीनी दूतावासात स्नेहभोजनाचं आयोजन कुणी केलं होतं?, चीनने अरुणाचलवर दावा सांगितल्यानंतर काँग्रेसनं तेथील चालू बांधकाम का बंद पाडलं?, अरुणाचलमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना चीनी सरकारनं व्हिजा नाकारला होता, त्यावर काँग्रेसनं काय केलं?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

एक इंचही जमीन कुठे जाणार नाही- शहा

नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीची सरकार सत्तेवर आहे. जोपर्यंत आमचं सरकार आहे, तोपर्यंत एक इंच जागेवरही कुणी ताबा करू शकत नाही. अरुणाचलच्या तवांगमध्ये भारतीय सैन्यानं दाखवलेल्या धैर्याचं मी कौतुक करतो. भारताच्या सीमेत घुसलेल्या चीनी घुसखोरांना भारतीय सैन्यानं पिटाळून लावलं आहे, असं म्हणत त्यांनी अरुणाचलमधील भारतीय आणि चीनी सैन्यातील संघर्षावर उत्तर दिलं आहे.