मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bandh : पुणे बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महामोर्चात खासदार उदयनराजे यांची उपस्थिती, राज्यपालांचा केला निषेध

Pune Bandh : पुणे बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महामोर्चात खासदार उदयनराजे यांची उपस्थिती, राज्यपालांचा केला निषेध

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 13, 2022 12:41 PM IST

Pune Bandh : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महामोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यात खासदार उदयनराजे यांचा देखील समावेश होता.

पुणे बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोशैयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पुण्यातील विविध संघटनांनी आणि पक्षांनी मिळून आज पुणे बंदची हाक दिली आहे. पुण्यातील व्यापारी त्याचप्रमाणे रिक्षा चालक, हमालपंचायत, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आदींनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळ पासून पुण्यातील रस्ते हे ओस पाहायला मिळाले. तसेच पुण्यातील सर्वात गजबजलेला परिसर असलेल्या मार्केटयार्ड परिसरात देखील शुकशुकाट पाहायला मिळाला. सकाळी ९ वाजता डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्यापासून सर्वपक्षीय मुक मोर्च्याला सुरुवात झाली. यात अनेक नेते, आमदार खासदार सहभागी झाले होते.

पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर निषेध रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे , प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले.

मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या दिसून आली आहे. राज्यपाल कोशियारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी काळीपट्टी दंडाला बांधत निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्र असलेला झेंडा आणि भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाल्याने भगवामय वातावरण पाहवयास मिळाले. सदर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी निषेध मोर्चा सुरू झालेल्या डेक्कन परिसर ते लाल महाल या दरम्यान चोख बंदोबस्त तैनात केला आहे. दुपारी ३ पर्यन्त हा बंद पाळण्यात येणार आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग