मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विटांची भिंत तोडून भरधाव कार घुसली घरात; ३ जण जखमी, कारचा चक्काचूर, पाहा Viral VIDEO

विटांची भिंत तोडून भरधाव कार घुसली घरात; ३ जण जखमी, कारचा चक्काचूर, पाहा Viral VIDEO

Apr 30, 2024, 04:28 PM IST

  • Car Rammed wall of House : एक भरधाव कार भिंत तोडून घरात घुसली. नोएडा सेक्टर-५५ मध्ये ही घटना घडली.याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भिंत तोडून भरधाव कार घुसली घरात

Car Rammed wall of House : एक भरधाव कार भिंत तोडून घरात घुसली. नोएडा सेक्टर-५५ मध्ये ही घटना घडली.याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Car Rammed wall of House : एक भरधाव कार भिंत तोडून घरात घुसली. नोएडा सेक्टर-५५ मध्ये ही घटना घडली.याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दिल्लीजवळच्या नोएडामध्ये भरधाव वेगाचा कहर दिसून आला. येथे एक भरधाव कार भिंत तोडून घरात घुसली. नोएडा सेक्टर-५५ मध्ये ही घटना घडली. येथील एका घराची भिंत तोडून कार आतमध्ये घुसली.या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये दिसते की, मातीच्या विटांनी बनवलेली घराची भिंत कारच्या धडकेत उध्वस्त झाली. या घटनेत ३ लोक जखमी झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : लग्नात 'स्मोक पान' खाल्ल्याने मुलीच्या पोटाला पडले छिद्र, मोठा भाग कापावा लागला

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये दिसते की, भिंतीला धडक दिल्यानंतर कारचा पुढचा भाग नुकसानग्रस्त झाला. व्हिडिओमध्ये दिसते की, काही लोक या अपघातानंतर तेथे उभे असल्याचे दिसत आहे. याबरोबरच काही पोलीस कर्मचारीही तेथे दिसून येत आहेत.

काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करत होते. भरधाव वेगात असलेली कार चालकाला नियंत्रित झाली नाही. व कार भरधाव वेगाने घरात घुसली. कार आधी घराच्या बाहेर बनवलेल्या गेटवर आदळली व नंतर भिंत तोडून घरात घुसली. नोएडा पोलिसांनी सांगितले की, कार चालकाने आधी एक रिक्षालाही धडक दिली होती त्यानंतर दोन महिलांना धडक दिली होती. यामध्ये दोन महिलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जो तरुण ही कार चालवत होता, त्यालाही या अपघातात दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कार भिंतीवर आदळल्यानंतर मोठा आवाज झाला होता. यामुळे आसपासचे लोक घटनास्थळी जमा झाले. या घडकेत कारचा पुढचा भाग तुटून खाली पडला होता. पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत.

कोव्हिशिल्डमुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम!

कोरोना विषाणूविरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली ही लस तयार करणाऱ्या अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात डीई आहे. कंपनीच्या या कबुली जबाबामुळे ही लस घेणाऱ्यांचे टेशन वाढले आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात अ‍ॅस्ट्राझेनेकाने या प्रकारची कबुली पहिल्यांदाच दिली आहे. त्यामुळे कंपनीच्या या कबुली जबाबाची जगभरात चर्चा सुरू आहे. ही लस भारतात अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून तयारी केली होती. त्यानंतर ही लस भारतासह जगभरातील अनेक नागरिकांना देण्यात आली होती.

विभाग

पुढील बातम्या