groom uses pm modi name in wedding card : लग्नपत्रिकेवर पंतप्रधान मोदींचे नाव छापणे एका वराला चांगलेच महागात पडले. याची माहिती निवडणूक आयोगाला मिळताच आयोगाचे पथक वरच्या डोक्यावर अक्षता पडण्या आधी वराच्या घरी पोहोचले. तसेच या बाबत वरच्या घरच्यांना स्पष्टीकर मागितले. यावर वरच्या घरच्यांनी दिलेले स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला पटले नाही. यामुले वराच्या विरोधात आयोगाने पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.
ही घटना कर्नाटकातील पुत्तूर तालुक्यातील उप्पिनगडी भागात घडली आहे. येथे एका तरुणाने आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर केला होता. यानंतर वर आणि त्याचे लग्न वादाच्या भोवऱ्यात सापडले. या घटनेवरून कर्नाटकात राजकीय वातावरणही तापले आहे.
वराने निमंत्रण पत्रिकेवर टॅगलाइन टाकली होती. ज्यामध्ये लिहिलं होतं- जर तुम्हाला नवीन जोडप्याला भेटवस्तू द्यायची असेल तर सर्वात मोठी भेट म्हणजे मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून देणं. निवडणूक आयोगाने लग्न पत्रिकेवरील या ओळीवर आक्षेप घेत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला आहे. निमंत्रण पत्रिका मिळालेल्या वराच्या नातेवाईकाने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर हा संपूर्ण गोंधळ सुरू झाला.
१८ एप्रिल रोजी मुलाचे लग्न झाले. दरम्यान, तक्रारीच्या आधारे निवडणूक आयोगाचे अधिकारी १४ एप्रिलला पुत्तूर तालुक्यातील वराच्या घरी गेले. तसेच या प्रकरणी वरच्या घरच्यांना उत्तर देखील मागण्यात आले. यावर स्पष्टीकरण देतांना वराने सांगितले की, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी निमंत्रण पत्रिका १ मार्च रोजी छापण्यात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्यासाठी आणि राष्ट्रहितासाठी लग्नपत्रिकेत ही ओळ लिहिली गेली आहे, असेही स्पष्टीकर देण्यात आले.
वराच्या स्पष्टीकरणानंतरही, निवडणूक आयोगाने २६ एप्रिल रोजी उप्पिनगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. याशिवाय निमंत्रण छापणारा प्रेस मालकही निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे.
संबंधित बातम्या