मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amrit Bharat Express : रेल्वे प्रवाशांना खूशखबर! देशातील ८० मार्गांवरून दररोज धावणार अमृत भारत एक्सप्रेस

Amrit Bharat Express : रेल्वे प्रवाशांना खूशखबर! देशातील ८० मार्गांवरून दररोज धावणार अमृत भारत एक्सप्रेस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 29, 2024 05:53 PM IST

Amrit Bharat Express Train : रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा प्रयोग यशस्वी झाल्याने जवळपास ४५० अमृत भारत गाड्यांच्या निर्मितीची ऑर्डर दिली आहे. येत्या ३ ते ४ वर्षात या गाड्या रुळावरून धावताना दिसणार आहेत.

देशातील ८० मार्गांवरून दररोज धावणार अमृत भारत एक्सप्रेस
देशातील ८० मार्गांवरून दररोज धावणार अमृत भारत एक्सप्रेस

भारतीय रेल्वे येत्या ३ वर्षात दिल्ली ते पूर्व भारताकडे जाणाऱ्या जवळपास ८० मार्गांवर प्रतिदिन कमीत कमी एक अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन संचालिक करणार आहे. यामुळे अल्प उत्पन्न गटातील प्रवाशांना तेज गतीने आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. यामुळे अन्य गाड्यांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचा प्रयोग यशस्वी झाल्याने जवळपास ४५० अमृत भारत गाड्यांच्या निर्मितीची ऑर्डर दिली आहे. येत्या ३ ते ४ वर्षात या गाड्या रुळावरून धावताना दिसणार आहेत. त्याचबरोबर सध्याच्या एलएचबी रॅकच्या रेल्वे गाड्यांचा रुपांतर हळू-हळू अमृत भारत ट्रेनच्या डिझाईनमध्ये केले जाईल. सेमी परमानेंट कपलर आणि दोन्ही बाजुंना इंजिन लावून याची शक्ती वाढवली जाईल. अर्थसंकल्पात ३ हजार ट्रेन्सना अमृत भारत तंत्रज्ञानाने आधुनिकीकृत करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वेची योजना आहे की, ३ ते ४ वर्षाच्या आत राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते पूर्व उत्तर प्रदेश,  बिहार,  बंगाल, ओडिशा आणि ईशान्य भारतात ८० मार्गावर दररोज अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल. यामुळे पूर्वेकडे जाणाऱ्या अन्य गाड्यांवरील ताण कमी होणार आहे. त्याचबरोबर अल्प उत्पन्न गटातील लोकांना सुविधाजनक व सुरक्षित प्रवास मिळेल. अमृत ​​भारत एक्सप्रेस ट्रेन २२ विना वातानुकूलित बोगी (११ सामान्य अनारक्षित आणि ११ स्लीपर श्रेणी कोच) एक एलएचबी पुश पुल ट्रेन सेट आहे. या ट्रेनच्या दोन्ही बाजुला ६०००  अश्वशक्तीचे २ लोको लावले आहेत. 

अमृत भारत ट्रेनमधील सुविधा -  
अमृत भारत रेल्वे प्रवाशांसाठी सुंदर आणि आकर्षक डिझाइनच्या सीट, सामान रॅक, मोबाइल होल्डरसह मोबाइल चार्जिंग प्वाइंट, एलईडी लाइट, सीसीटीव्ही, सार्वजनिक सूचना प्रणाली सारख्या सुविधा प्रदान केल्या आहेत. यामध्ये सेमी परमानेंट कपलर लावले आहेत. यामुळे गाडी धावताना व थांबताना झटके लागत नाहीत. गाडीतील शौचालय आधुनिक डिझाइनवर आधारित आहेत व यामध्ये वॉशबेसिनचे नळाचे बटण पायाने ऑपरेट होणारे आहेत. 

दोन्ही बाजुला इंजिन असल्यामुळे गाडी थाबल्यास व वेग पकडण्यास (एक्सीलरेशन एवं डि-एक्सीलरेशन) मध्ये खूप कमी वेळ लागतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमृत भारत एक्सप्रेसचे ५० रॅक निर्माण केले जात असून ४०० रॅकच्या निर्माणाची ऑर्डर लवकरच दिली जाणार आहे. अमृत भारत एक्सप्रेस कमाल १३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावतील, कारण हा गाड्या विना वातानुकुलित असून याच्या खिडक्या खुल्या असतात.

IPL_Entry_Point