मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याने घेतली सेल्फी अन् तोडली कारची काच, अभिनेत्याने डोक्यावर मारला हात

VIDEO : अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याने घेतली सेल्फी अन् तोडली कारची काच, अभिनेत्याने डोक्यावर मारला हात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 29, 2024 07:08 PM IST

Pawan singh Viral Video : एक फॅन पवन सिंहसोबत सेल्फी घेण्यासाठी लक्झरी कारवर चढतो फॅनने पवन सिंह यांच्यासोबत सेल्फी घेतली, पण त्यांच्या महागड्या गाडीचे मोठे नुकसान केले.

चाहत्याने घेतली सेल्फी अन् तोडली कारची काच, अभिनेत्याने डोक्यावर मारला हात
चाहत्याने घेतली सेल्फी अन् तोडली कारची काच, अभिनेत्याने डोक्यावर मारला हात

Lok Sabha Elections 2024: भोजपुरी अभिनेता पवन सिंह (pawan singh) काराकाट लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत. पवन सिंह जोरदार प्रचार करत असून अनेक रोड शो करत आहेत. प्रचारादरम्यान पवन सिंह यांच्या रॅलीमध्ये लोकांची मोठी गर्दी होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान सोशल मीडियावर त्यांच्या निवडणूक प्रचाराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, रेंज रोवर कार वर सवार होऊन पवन सिंह रोड शो करत आहेत. यावेळी एक फॅन त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लक्झरी कारवर चढतो फॅनने पवन सिंह यांच्यासोबत सेल्फी घेतली, पण त्यांच्या महागड्या गाडीचे मोठे नुकसान केले.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, पवन सिंह आपल्या गाडीने लोकांमध्ये जाऊन निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी त्यांचा एक चाहता त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गाडीवर चढतो. चाहता गाडीवर बराच वेळ बसल्यानंतर पवन सिंह त्याला गाडीवरून खाली उतरण्यास सांगतात.

त्यानंतर हा व्यक्ती गाडीवरून खाली उतरताना कारची विंडशील्ड क्रॅक होते. यामुळे पवन सिंह यांचे मोठे नुकसान होते. त्यानंतर व्हिडिओमध्ये पवन सिंह यांची रिएक्शनही पाहायला मिळते. आपल्या गाडीची काच तुटल्यानंतर ते हसतात व डोक्यावर हात मारतात. त्यानंतर अन्य लोकांकडे पाहून हात हलवू लागतात.

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लेटफॉर्म एक्सवर@छपरा जिल्हा नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, या तरुणाने सेल्फीच्या नादात भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांच्या महागड्या कारची काच तोडली. निवडणुकीची वेळ असल्याने पवन सिंह हसत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, मोठ्या लोकांची ओळख. दुसऱ्या एका अन्य युजरने लिहिले की, निवडणूक काय-काय करायला लावते. जर वेळ दुसरी असती तर पवन सिंह यांनी शिव्याही दिल्या असत्या आणि पैसेही घेतले असते.

IPL_Entry_Point