मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vidhansabha Elections : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार?, निवडणूक आयोगाने जारी केल्या सूचना

Vidhansabha Elections : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार?, निवडणूक आयोगाने जारी केल्या सूचना

May 28, 2023, 11:42 AM IST

    • Loksabha Vidhansabha Elections 2023 : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
Loksabha And Vidhansabha Elections 2023 (HT)

Loksabha Vidhansabha Elections 2023 : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

    • Loksabha Vidhansabha Elections 2023 : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Loksabha And Vidhansabha Elections 2023 : आगामी लोकसभा आणि अनेक राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळं लोकसभा आणि महाराष्ट्रातील निवडणुका सोबत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी याबाबतचे संकेत दिले आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, असे आदेश प्रशासनाला दिले आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना एक आदेश जारी केला आहे. त्यात अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाशिवाय अन्य जबाबदारी न देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. दोन्ही निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी अधिकाऱ्यांनी मतदारसंघातील स्थितीचे रिपोर्ट्स तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेची मुदत ऑक्टोबर २०२४ मध्ये संपणार आहे. तसेच लोकसभेची निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्र तसेच हरयाणातील विधानसभा विसर्जित करून दोन्ही राज्यांच्या निवडणुका लोकसभेबरोबर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीची पूर्वतयारी, संचलन, मतदान यंत्रांची तपासणी आणि मतदार याद्या तयार करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलं आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कोणतीही अतिरिक्त जबाबदारी न देण्याच्या सूचना केल्यामुळं लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.