मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Employment News : बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंत दीड लाख पदांसाठी भरती

Employment News : बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंत दीड लाख पदांसाठी भरती

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 28, 2023 10:39 AM IST

Maharashtra Employment News : राज्यात लवकरच मोठी पदभरती केली जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

नोकरीच्या संधी
नोकरीच्या संधी

Maharashtra Employment News : राज्यातील अनेक मंत्रालयीन विभाग आणि महापालिकांमध्ये मोठी पदभरती होत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेरोजगारांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत महाराष्ट्रात दीड लाख जागा भरण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रातील सरकारी खात्यांत व विभागांत दीड लाखाहून अधिक नोकरभरती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी आणि त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र वचनबद्ध आहे. आगामी डिसेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रात दीड लाख पदांवर भरती करण्यात येणार असून एमएसएमईसाठी क्लस्टर योजना सुरू करण्याचा आमचा विचार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक मोठ-मोठी विकासकामं आमच्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहे. त्यातून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक प्रकल्प बंद करण्यात आले होते. त्या प्रकल्पांना आता आमच्या सरकारने सुरू करत वेग दिला आहे. आम्ही अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग आणि मेट्रोच्या प्रकल्पांना वेग देण्याचं काम करत आहे. त्यामुळं या उद्योगांतून राज्यातील कुशल युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत दीड लाख पदांची भरती केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

IPL_Entry_Point