मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  New Parliament Building : आंध्रातील दिग्गज नेत्याच्या सन्मानार्थ १०० रुपयांचं चांदीचं नाणं जारी होणार

New Parliament Building : आंध्रातील दिग्गज नेत्याच्या सन्मानार्थ १०० रुपयांचं चांदीचं नाणं जारी होणार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 28, 2023 08:56 AM IST

New Parliament Building Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ७५ रुपयांचं नाणं जारी करण्यात येणार आहे. तसेच १०० रुपयांचं चांदीचं नाण्याचंही अनावरण करण्यात येणार आहे.

N.T.Rama Rao
N.T.Rama Rao (HT)

New Parliament Building Inauguration : भारताच्या नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे. तसेच केंद्र सरकार स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने ७५ रुपयांचं नाणं जारी करणार आहे. नव्या संसद भवनात मोदींच्या हस्ते पूजाविधी सुरू असून थोड्याच वेळात नव्या इमारतीचं लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यापूर्वी नव्या संसद भवनात लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी सेंगोल (राजदंड) स्थापित करण्यात आला आहे. यावेळी देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी संसद परिसरात हजेरी लावली आहे. त्यानंतर आता आंध्रप्रदेशसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून शंभर रुपयांचं चांदीचं नाणं जारी करण्यात येणार आहे. तेलगू देशम पक्षाचे दिवंगत नेते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या सन्मानार्थ केंद्र सरकार शंभर रुपयांचं नाणं जारी करणार आहे. शंभर रुपयांच्या नव्या चांदीच्या नाण्यावर एनटी रामाराव यांचे छायाचित्र असणार आहे. एनटी रामाराव यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने केंद्राकडून त्यांच्या सन्मानार्थ शंभर रुपयांचं चांदीचं नाणं जारी करण्यात येणार आहे.

यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तेलगू देशम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्र सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण न दिल्याचा आरोप करत देशातील २० राजकीय पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. तर भाजपशी युती असलेल्या पक्षाचे नेते कार्यक्रमासाठी दिल्लीत रवाना झाले आहे. त्यामुळं दिल्लीतील कार्यक्रमाकडे भारतासह देशभरातील नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point