मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

May 02, 2024, 03:40 PM IST

  • Pakistan Army Helicopters : पाकिस्तानी लष्कराची हेलीकॉप्टर्स गव्हाच्या पिकांवर घिरट्या घालताना काही लोकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद करत याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे.

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं

Pakistan Army Helicopters : पाकिस्तानी लष्कराची हेलीकॉप्टर्स गव्हाच्या पिकांवर घिरट्या घालताना काही लोकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद करत याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे.

  • Pakistan Army Helicopters : पाकिस्तानी लष्कराची हेलीकॉप्टर्स गव्हाच्या पिकांवर घिरट्या घालताना काही लोकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद करत याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे.

पाकिस्तानमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, पाकिस्तानी आर्मीचे कोबरा सारखे अत्याधुनिक हेलीकॉप्टर गव्हाच्या शेतावरती घिरट्या घालून पिके वाळवत आहे. लष्कराची हेलीकॉप्टर्स गव्हाच्या पिकांवर घिरट्या घालताना काही लोकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद करत तो व्हायरल केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

blinkit viral news : 'या' ठिकाणी कोथिंबीर मिळणार फ्री! आता ऑनलाइन भाजी खरेदीतही मिळणार भाजी मंडईची मजा

lightning : निसर्गाचा कहर..! वीज अंगावर कोसळून २ शालेय विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू, २ गंभीर

karnataka News : प्रियकराने घरात घुसून झोपलेल्या तरुणीची चाकूने वार करत केली हत्या, दोन पोलीस निलंबित

यावरून पाकिस्तानी पीएम शहबाज शरीफ यांची खिल्ली उडवली जात आहे. लोक प्रश्न करत आहेत की, देशात खाण्याचे वांदे झाले आहेत. सरकार दुसऱ्या देशातून भीक मागून खर्च चालवत आहेत. मात्र अशी काय मजबुरी आहे की, लष्कराच्या हेलीकॉप्टर्सच्या माध्यमातून गव्हाचे शेत सुखवले जात आहेत.

पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा होत असलेल्या या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. हे हेलिकॉप्टर गहू सुखवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान काही लोकांनी दावा केला आहे की, लष्कराचे जवान युद्धाभ्यास करत आहेत.

काय आहे व्हिडिओची सत्यता?
नुकतीत पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाली आहे. पाकिस्तानमध्ये पाऊस त्यावेळी झाला जेव्हा गव्हाचे पीक कापणीसाठी तयार होते. दुसरीकडे शहबाज सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये गव्हाबाबत वाद सुरू आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतेच आपल्या परदेश दौऱ्याआधी शेतकऱ्यांकडील गहू लवकरात लवकर खरेदी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा व कुठला आहे, याची पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ जवळपास चार दिवसापूर्वी टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला होता. त्याला कॅप्शन दिले होते की, हे आर्मीच्या युद्धाभ्यासाचे दृष्य आहे. टिकटॉकवर आल्यानंतर हा व्हिडिओ यूट्यूब प्लेटफॉर्मवरही एका यूजरने युद्धाभ्यासाचा सीन म्हणून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

युद्धाभ्यास करत आहेत लढावू विमाने?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही असेही सीन आहेत, ज्यामध्ये आर्मीचे हेलिकॉप्टर गव्हाच्या शेतावरून घिरट्या घालताना दिसत आहेत. यावर लोकांनी दावा केला आहे की, ते गव्हाचे शेत सुखवत आहेत. एका माजी अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितले की, व्हिडिओत दिसलेले हेलिकॉप्टर कोबरा लढाकू विमाने आहेत. तर एक हेलिकॉप्टरचे नाव फेनेक आहे.

पुढील बातम्या