Vande Bharat Metro : वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर, लवकरच होणार लाँच; पाहा VIDEO-vande bharat metro is ready first glimpse revealed this train will run in these cities ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande Bharat Metro : वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर, लवकरच होणार लाँच; पाहा VIDEO

Vande Bharat Metro : वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर, लवकरच होणार लाँच; पाहा VIDEO

May 01, 2024 06:16 PM IST

Vande Bharat Metro Train First Glimpse: १०० ते २५० किमी अंतरादरम्यान वंदे भारत मेट्रो ट्रेन धावणार आहे. याची पहिली झलक समोर आली आहे. सुरुवातीला अशा ५० ट्रेन बनवल्या जातील, नंतर याची संख्या ४०० पर्यंत वाढवली जाईल.

वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर
वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर

Vande Bharat Metro Train First Glimpse : वंदे भारत ट्रेननंतरआता देशातील अनेक मोठ्या शहरात वंदे भारत मेट्रो (Vande Bharat Metro) सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. वंदे भारत मेट्रो ट्रेनची पहिली झलक समोर आली आहे. या विशेष मेट्रो ट्रेनची ट्रायल (First Vande Bharat Metro) याचवर्षी जुलै महिन्यात घेतली जाईल. पंजाबमधील कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत मेट्रोचे काही डब्बे तयार झाले आहेत.

रिपोर्टनुसार, सुरुवातीला अशा ५०ट्रेन बनवल्या जातील. हळू-हळू याची संख्या वाढवून ४०० केली जाईल. सूत्रांनी सांगितले की, वंदे भारत मेट्रो ट्रेन १०० किमी ते २५० किमीपर्यंत चालवल्या जातील. यामध्ये डिफॉल्ट कॉन्फिगरेशनच्या रुपात १२ कोच असतील. मात्र याची संख्या १६ कोचपर्यंत वाढवली जाईल.

वंदे भारत (VB Metro) देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन पहिल्यांदा १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली आणि वाराणसी दरम्यान धावली होती. आज देशात १०२ वंदे भारत ट्रेन २४ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील २८४ जिल्ह्यातील १०० मार्गावर धावते.

 

मुंबई लोकल ट्रेनऐवजी धावणार सुरक्षित वंदे भारत मेट्रो -

मुंबईतील लोकल ट्रेन्सना पुढच्या ३ ते ४ वर्षात वंदे भारत मेट्रो ट्रेन सेटमध्ये बदलण्यात येईल. याच्या माध्यमातून मुंबई दररोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मेट्रोच्या धर्तीवर एसी आणि स्वंयचलित दरवाजे असलेली सुरक्षित सेवा मिळेल. रेल्वे बोर्डाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपूरथला येशील रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत मेट्रो ट्रेनची पहिली रॅक जवळपास बनून तयार आहे. वंदे भारत मेट्रोचे (Vande Metro Trains) ५० रॅक बनल्यानंतर ४०० आणखी रॅक बनवण्याची आर्डर दिली जाईल. देशातील १२ मोठ्या व मध्यम शहरांदरम्यान वंदे भारत मेट्रोतून दैनंदिन प्रवासाची सुविधा दिली जाईल.

ही ट्रेन १६० किमी प्रति तास वेगाने धावेल. वंदे मेट्रो ट्रेन्स (Vande Metro Trains) दोन शहरांमध्ये १०० ते  २५० km अंतरावर चालवण्यात येईल. सुरुवातीला लखनौ-कानपूर, आगरा- मथुरा, दिल्ली-रेवाडी, भुवनेश्वर -बालासोर आणि तिरुपती-चेन्नई दरम्यान धावणार आहे.

वंदे भारत मेट्रो ट्रेन १२ कोच असलेला ट्रेन सेट असेल. त्यात आवश्यकतेनुसार १६ कोच बनवले जातील. ही काही सेंकदाततेज स्पीडने धावणारी मेट्रो ट्रेन असेल. ही ट्रेन सरासरी १०० ते २५० किलोमीटर अंतरावरील दोन प्रमुख स्टेशन दरम्यान अनेक फेऱ्यात चालवण्याची योजना आहे. सूत्रांनी सांगितले की, भविष्यात मुंबई, कोलकाता, चेन्नई आदि महानगरात उपनगरीय रेल्वे सेवामध्ये धावणाऱ्या गाड्या वंदे भारत मेट्रो मध्ये बदलण्यात येतील. यामुळे प्रवाशांना तेज गतीने धावणारी ट्रेन सुविधा मिळेल.

Whats_app_banner