मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Dolo-650 Tablet चे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर इन्कम टॅक्सची धाड

Dolo-650 Tablet चे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर इन्कम टॅक्सची धाड

HT Marathi Desk HT Marathi

Jul 08, 2022, 01:23 PM IST

    • कोरोना साथीदरम्यान Dolo-650 या तापावरील गोळीचं नाव घराघरात पोहचलं. मात्र आता ही कंपनी प्राप्तीकर न भरल्याच्या कारणावरून चर्चेत आली आहे.
Dolo-650 manufacturer Micro Labs Limited office where Income Tax Department conducted searches on charges of alleged tax evasion, in Bengaluru. (HT_PRINT)

कोरोना साथीदरम्यान Dolo-650 या तापावरील गोळीचं नाव घराघरात पोहचलं. मात्र आता ही कंपनी प्राप्तीकर न भरल्याच्या कारणावरून चर्चेत आली आहे.

    • कोरोना साथीदरम्यान Dolo-650 या तापावरील गोळीचं नाव घराघरात पोहचलं. मात्र आता ही कंपनी प्राप्तीकर न भरल्याच्या कारणावरून चर्चेत आली आहे.

कोरोना साथीदरम्यान Dolo-650 या तापावरील गोळीचं नाव घराघरात पोहचलं. मात्र आता ही कंपनी प्राप्तीकर न भरल्याच्या कारणावरून चर्चेत आली आहे. बंगळुरूस्थित ‘मायक्रो लॅब्ज’ ही कंपनी Dolo-650 गोळीचे उत्पादन करते. जुलै २०२० ते जून २०२१ दरम्यान Dolo-650 या गोळीच्या विक्रीत ७४ टक्क्याने वाढ झाल्याची माहिती आहे. कंपनीने यादरम्यान साडे तीन कोटी Dolo-650 गोळ्यांची विक्री केली असून यातून ४०० कोटी रुपयांची कंपनीला कमाई झाली असल्याचे समजते. मात्र यादरम्यान ‘मायक्रो लॅब्ज’ कंपनीने प्राप्तीकर चुकवल्याचा संशय आहे. त्यामुळे प्राप्तीकर खात्याकडून या कंपनीचे आर्थिक व्यवहार सध्या तपासले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral news : किडनी स्टोन दूर करण्यासाठी दररोज २ लिटर लघवी प्या, गुगल एआयनं दिलं धक्कादायक उत्तर

Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्या तिसऱ्या अंतराळ प्रवासात विघ्न; उड्डाण स्थगित! काय आहे कारण?

passport fake websites : पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! खोट्या पासपोर्ट वेबसाइट्समुळे अर्जदारांची फसवणूक

Sunita Williams : मागच्या वेळी नेली भगवदगीता; यावेळी सुनिता विलियम्स 'या' लकी देवतेची मूर्ती अंतराळात नेणार

मायक्रो लॅब्ज कंपनीशी संबंधित ४० ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकून तपासणी सुरू केली आहे. कंपनीच्या वेगवेगळ्या राज्यांतील कार्यालयांमध्ये कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. कर्नाटकमध्ये बंगळुरूत असलेल्या मुख्यालयातही तपासणी सुरू झाली आहे. तसेच कंपनीचे सीएमडी दिलीप सुराणा आणि संचालक आनंद सुराणा यांच्या घरांवर आयकर विभागाची धाड टाकली आहे.

ताप आणि विषाणूजन्य आजारांची लक्षणे दिसल्यावर साधारणतः पॅरासिटॅमॉल ही औषध गोळी घेतली जाते. त्याप्रमाणेच डोलो गोळीत ६५० ग्रॅम पॅरासिटॅमॉलचे प्रमाण असते. कोरोना काळात ताप व अंगदुखीवर गुणकारी म्हणून डॉक्टरांकडून Dolo-650 हे औषध लिहून दिले जाते. त्यामुळे कोरोनानंतर ‘अंगदुखी किंवा ताप आला की Dolo-650 घ्या’ असं सरसकट समिकरण तयार झालं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमातही लस घेतल्यावर ताप आल्यास Dolo-650 ही गोळी घेण्याचा सल्ला दिला जायचा. परिणामी देशभरात Dolo-650 गोळीची विक्रमी विक्री सध्या सुरू आहे.

 

विभाग