मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Salt water : मिठाच्या पाण्यानं अंधोळ केल्यानं तणाव होतो कमी; वाचा अन्य फायदे!

Salt water : मिठाच्या पाण्यानं अंधोळ केल्यानं तणाव होतो कमी; वाचा अन्य फायदे!

Jul 08, 2022, 01:19 PM IST

    • Advantages of bathing with salt water : सध्याच्या काळात अनेक लोकांना मानसिक तणाव आणि नैराश्याचा सामना करावा लागत आहे. परंतु अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळल्यास त्यामुळं तणावाची समस्या कमी करता येऊ शकते.
Advantages of bathing with salt water (HT)

Advantages of bathing with salt water : सध्याच्या काळात अनेक लोकांना मानसिक तणाव आणि नैराश्याचा सामना करावा लागत आहे. परंतु अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळल्यास त्यामुळं तणावाची समस्या कमी करता येऊ शकते.

    • Advantages of bathing with salt water : सध्याच्या काळात अनेक लोकांना मानसिक तणाव आणि नैराश्याचा सामना करावा लागत आहे. परंतु अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळल्यास त्यामुळं तणावाची समस्या कमी करता येऊ शकते.

Benefits of salt water : असंतुलित आहार व बदलत्या जीवनशैलीमुळं अनेक लोकांना आयुष्यात तणाव आणि नैराश्याच्या सामना करावा लागत आहे. तणावाचा प्रभाव केवळ व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही होत असतो. त्यामुळं अनेदा तणावग्रस्त लोक हे डॉक्टरांचा सल्ला घेणं पसंत करतात. परंतु त्याला फारसं यश येत नाही. त्यामुळं आता बदलत्या काळानुसार तणाव व नैराश्य कमी करण्यासाठी काय करायला हवं, याबाबत जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

तणाव कमी करण्यासाठी काय कराल?

तणावग्रस्त व्यक्ती हा नेहमी नकारात्मक विचार करत असतो. त्याला मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या आयुष्यात सकारात्मकता येणं फार गरजेचं असतं. त्यासाठी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात थोडंस मिठ टाकलं तर त्यामुळं मानसिक तणावाची समस्या कमी होत असते, हे अनेक संशोधनांद्वारे समोर आलेलं आहे.

सांधेदुखी कमी होईल...

मिठाच्या पाण्यानं अंघोळ केल्यास सांधेदुखीची समस्या कमी होऊ शकते. त्यामुळं ज्या लोकांना या आजाराची समस्या आहे त्या लोकांनी अंघोळ करताना पाण्यात चिमूटभर मीठ टाकायला हवं.

हंगामी आजार कमी होतील...

कोणत्याही प्रकारचे संसर्ग रोखायचे असतील तर त्यासाठी मिठाच्या पाण्यानं अंघोळ करणं गुणकारी मानलं जातं. कारण मिठामध्ये असलेल्या खनिजे आणि इतर पोषकतत्वांमुळं शरीरातील सर्व छिद्र ओपन होतात, आणि संसर्गाचा धोका कमी होत जातो.

चेहऱ्यावर पुरळ येत नाहीत...

ज्या लोकांच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर नेहमी पुरळ येत असतात त्यांनी दररोज मिठाच्या पाण्यानं अंघोळ करायला हवी. त्यामुळं त्वचेवरील घाण बाहेर पडण्यास मदत होते. व काळे डाग आणि पुरळही कमी होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या