मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्या तिसऱ्या अंतराळ प्रवासात विघ्न; उड्डाण स्थगित! काय आहे कारण?

Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्या तिसऱ्या अंतराळ प्रवासात विघ्न; उड्डाण स्थगित! काय आहे कारण?

May 07, 2024, 10:32 AM IST

  • Sunita Williams Astronaut : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांची तिसरी अंतराळ यात्रा स्थगित करण्यात आली असून ती पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, प्रक्षेपणाची नवी तारीख काय असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. तांत्रिक बिघाडामुळे होणारे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्या तिसरा अंतराळ प्रवासात विघ्न; उड्डाण स्थगित! काय कारण? (PTI)

Sunita Williams Astronaut : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांची तिसरी अंतराळ यात्रा स्थगित करण्यात आली असून ती पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, प्रक्षेपणाची नवी तारीख काय असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. तांत्रिक बिघाडामुळे होणारे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.

  • Sunita Williams Astronaut : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांची तिसरी अंतराळ यात्रा स्थगित करण्यात आली असून ती पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, प्रक्षेपणाची नवी तारीख काय असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. तांत्रिक बिघाडामुळे होणारे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Sunita Williams Astronaut : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांचा तिसरा अंतराळ प्रवास काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आला आहे. प्रक्षेपणाची नवी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. यानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे. विल्यम्स या बोईंग स्टारलाइनरद्वारे अंतराळात जाण्याच्या तयारीत होत्या. विशेष म्हणजे या मोहिमेचे यश इलॉन मस्क यांच्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Ajit Pawar: रोहित पवारांच्या 'त्या' आरोपांवर अजित पावर बरसले! मतदान होताच म्हणाले,'त्याच्या डोक्यावर परिमाण झाला'

विल्यम्स या त्यांच्या वयाच्या ५८ वर्षी आज मंगळवारी पुन्हा पायलट म्हणून तिसऱ्यांदा अंतराळात जाणार होत्या. फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल येथील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित होणाऱ्या बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून त्या आज उड्डाण करणार होत्या. स्टारलाइनरद्वारे विल्यम्स आणि बुच विल्मोरला हे दोघे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार होते. त्यांचे हे उड्डाण सध्या अडचणीत असलेल्या बोईंग कार्यक्रमासाठी एक महत्त्वपूर्ण आणि बहुप्रतिक्षित मानले जात होते.

passport fake websites : पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! खोट्या पासपोर्ट वेबसाइट्समुळे अर्जदारांची फसवणूक

हे अंतराळयान सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री १०:३४ वाजता (मंगळवारच्या आंतरराष्ट्रीय वेळेनुसार रात्री ८:०४ वाजता) प्रक्षेपित होणार होते. ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बीबीसी) विल्यम्स यांचा हवाला देत म्हटले आहे की, 'आम्ही सर्वजण येथे प्रक्षेपणास्तही तयार आहोत. "आमच्या मित्रांना या बद्दल माहिती असून त्यांनी या साठी आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही या मोहिमेचा एक भाग आहोत याचा त्यांना आनंद आणि अभिमान आहे."

या अंतराळयानाच्या निर्मिती प्रक्रियेत अनेक अडथळे आल्याने ही मोहीम गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडली होती. जर या मोहिमेचे आज उड्डाण झाले असते तर ही मोहीम यशस्वी झाली असती. ही मोहीम एलोन मस्कच्या SpaceX बरोबरच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर क्रू घेऊन जाण्यास सक्षम असणारी दुसरी खाजगी कंपनी बनणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहीम रद्द करण्यात आली आहे. यूएस स्पेस एजन्सी नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी २२ मार्च रोजी पत्रकार परिषदेत आगामी स्टारलाइनर मिशनबद्दल माहिती देत आम्ही 'इतिहास रचणार असून आम्ही अवकाश संशोधनाच्या सुवर्णयुगात आहोत, असे ते म्हणाले होते.

१९८८ मध्ये नासाने सुनीता विल्यम्स यांची अंतराळवीर म्हणून निवड केली. विल्यम्स यांना दोन अंतराळ मोहिमांचा अनुभव आहे. त्यांनी एक्सपिडिशन ३२ चे फ्लाइट इंजिनीअर आणि एक्सपिडिशन ३३ चे कमांडर म्हणून काम केले. विल्यम्स यांनी ९ डिसेंबर २००६ रोजी मोहीम १४/१५ दरम्यान एसतीएस-११६ क्रूसह उड्डाण केले होते. आणि ११ डिसेंबर २००६ रोजी त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या होत्या.

Baramati Lok Sabha : बारामतीमध्ये पैशांचा पाऊस! मध्यरात्र उलटूनही जिल्हा बँकेचे कामकाज सुरू, रोहित पवारांचा गंभीर आरोप

विल्यम्स यांच्या पहिल्या मोहिमेत त्यांनी एकूण २९ तास १७ मिनिटे अंतराळात चार वेळा स्पेस वॉक घेतला होता. याचा महिलांसाठी जागतिक विक्रम देखील त्यांनी केला होता. यानंतर अंतराळवीर पेगी व्हिटसनने २००८ मध्ये एकूण पाच वेळा अंतराळात चालत हा विक्रम मोडला. एक्सपिडिशन ३२/३३ मध्ये, विल्यम्स यांनी १४ जुलै २०१३ रोजी रशियन सोयुझ कमांडर युरी मालेन्चेन्को आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे फ्लाइट इंजिनियर अकिहिको होशिदे यांच्यासह कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोनवरून अंतराळात उड्डाण केले.

अंतराळात केले अनेक शोध कार्य

त्या वेळी विल्यम्स यांनी प्रयोगशाळेत फिरताना चार महिने संशोधन आणि शोधकार्य केले. १२७ दिवस अंतराळात राहिल्यावर त्या १८ नोव्हेंबर २०१२ रोजी कझाकिस्तान येथे पोहोचल्या. त्यांच्या मोहिमेदरम्यान, विल्यम्स आणि होशिड यांनी तीन स्पेसवॉक केले आणि स्टेशनच्या रेडिएटरमधून अमोनिया गळतीची दुरुस्ती केली.

अंतराळात चालण्याचा जागतिक विक्रम

५० तास आणि ४० मिनिटांच्या स्पेसवॉकसह, विल्यम्सने पुन्हा एकदा महिला अंतराळवीराचा सर्वात लांब अंतराळात चालण्याचा जागतिक विक्रम केला. विल्यम्स या एकूण ३३२ दिवस अंतराळात राहिल्या आहेत. विल्यम्स यांचा जन्म युक्लिड, ओहायो येथे भारतीय-अमेरिकन न्यूरोएनाटोमिस्ट दीपक पांड्या आणि स्लोव्हेनियन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पांड्या यांच्या घरी झाला. त्यांनी यूएस नेव्हल अकादमीमधून भौतिकशास्त्राची पदवी आणि फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली.

विभाग

पुढील बातम्या