Ajit Pawar on Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार ऊतर दिले आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत बारामती लोकसभा मतदार संघातील भोर वेल्हा येथे पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, मतदानाचा हक्क बाजवल्यावर अजित पवार यांनी मध्यमांशी संवाद साधला. पवार यांनी हे आरोप फेटाळले असून म्हणाले, आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरले आहे. तो काही ही आरोप करतो. माझ्या दृष्टीकोनातून या आरोपांना फारसे महत्त्त्व द्यावे असे वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची देखील गरज वाटत नाही, असे अजित पवार म्हणाले.
बारामती येथे अजित पवार यांनी बारामती लोकसभेच्या उमेदवार आणि पत्नी सुनेत्रा पवार आणि आई आशाताई अनंत पवार यांच्या सोबत मतदान केले. पवार म्हणाले, सध्या ते आमच्यावर आरोप करत आहे. मी देखील त्यांनी निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केला असा आरोप करू शकतो. परंतु मी असे काही करणार नाही. सध्या ते काहीही आरोप करत सुटले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का? समोर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला आहे. तो काही आरोप करतो. त्या आरोपाला माझ्या दृष्टीकोनातून महत्त्त्व द्यावे असे वाटत नाही, असे अजित पावर म्हणाले.
बारामती व वेल्ह्यात पैसे वाटल्याचा आरोप देखील अजित पवार यांनी फेटाळला आहे. अजित पवार म्हणाले, हे काम निवडणूक आयोगाचे आहे. मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत असे मी कधी केले नाही आणि करणार देखील नाही. कारण नसताना विरोधकांचे काही बागलबच्चे माझ्यावर आणि कार्यकरतींवर खोटे आरोप करत आहेत.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयावरून पुन्हा टीका केली आहे. अजित पवार यांनी आज त्यांची आई आशाताई पवार यांच्यासोबत मतदान केले. यावरून त्यांनी निशाणा साधला आहे. पवार म्हणाले, आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे म्हणत अजित पवारांनी टोला हाणला आहे. अजित पवार यांनी बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार यांच्यासह काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.