मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Besharam Rang: दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ गाण्यावरून थिएटरमध्ये हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Besharam Rang: दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ गाण्यावरून थिएटरमध्ये हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Jan 26, 2023, 06:45 PM IST

  • Pathaan Film Controversy : चित्रपटगृहात बेशरम रंग गाणं सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हाणामारी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Besharam Rang Song Controversy (HT)

Pathaan Film Controversy : चित्रपटगृहात बेशरम रंग गाणं सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हाणामारी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Pathaan Film Controversy : चित्रपटगृहात बेशरम रंग गाणं सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हाणामारी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Besharam Rang Song Controversy : पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोनने भगवी बिकीनी घातल्यावरून मोठा राजकीय वादंग पेटलेला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या विरोधानंतर वादग्रस्त सीन्स चित्रपटातून काढण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डानं घेतल्यानंतर आता कालपासून देशभरातील लाखो थिएटरमध्ये पठाण चित्रपट रिलीज झाला आहे. अनेक ठिकाणी लोकांनी पठाण चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु आता चित्रपटावेळी बेशरम रंग गाण्यावेळी प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली शहरातील एका थिएटरमध्ये ही घटना घडली असून त्यानंतर आता या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

उत्तर प्रदेशातील बरेलीतील फिनिक्स मॉलमध्ये पठाण चित्रपटाचं स्क्रिंनीग सुरू होतं. त्यावेळी बेशरम रंग गाणं सुरू होताच पठाण चित्रपटाचे समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही गटात शिवीगाळ झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटगृहातच जोरदार हाणामारी सुरू झाली. मारहाणीत पाच लोकांना गंभीर मार लागला असून त्यानंतर उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बरेलीच्या इज्जतनगरमधील फिनिक्स मॉलमध्ये सुरू असलेल्या शो दरम्यान हा राडा झाला आहे. बेशरम रंग गाण्यात दीपिकानं भगव्या रंगाचीच बिकीनी घातल्याचा आरोप प्रेक्षकांच्या एका गटानं केला आहे. तर सर्वजण शांततेत चित्रपट पाहत असतानाच काही तरुणांनी चित्रपटगृहात शिवीगाळ केल्याचा आरोप दुसऱ्या गटानं केला आहे. हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं फिनिक्स मॉलमध्ये धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.