मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lonikand Pune : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; संतापजनक घटनेनंतर आरोपीला अटक

Lonikand Pune : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; संतापजनक घटनेनंतर आरोपीला अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 26, 2023 05:04 PM IST

Lonikand Pune Rape Case : आरोपीनं तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून लॉजवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Lonikand Pune Crime News
Lonikand Pune Crime News (HT_PRINT)

Lonikand Pune Crime News : महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात ही घटना घडली असून त्यानंतर आता पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. हणमंत किसन सांगळे असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं आता पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरू असतानाच बलात्काराची घटना समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात शिकणाऱ्या एका तरुणीला आरोपी हणमंत लग्नाचं आमिष दाखवून गेल्या वर्षभरापासून बलात्कार करत होता. तरुणीला हॉटेल आणि लॉजमध्ये नेवून आरोपीनं तिच्यावर बलात्कार करत त्याचा व्हिडिओही शूट केला होता. त्यानंतर आरोपीनं फसवणूक केल्याचं समजताच तरुणीनं त्याला जाब विचारायला सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीनं पीडितेला अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या तरुणीनं तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता लोणीकंदमध्येही लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं पुण्यात खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीनं तक्रार दाखल केल्यानंतर पुण्यातील लोणीकंद पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. त्यानंतर आता पुढील कारवाई केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point