मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  'अग्निपथ'ला विरोधानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, योजनेत आतापर्यंत केले ५ बदल

'अग्निपथ'ला विरोधानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, योजनेत आतापर्यंत केले ५ बदल

Jun 20, 2022, 02:40 PM IST

    • अग्निपथ योजनेला वाढत्या विरोधानतंर सरकारने या योजनेमध्ये काही बदल केले. सरकारने तरुणांच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न यातून केला.
भारतीय लष्कराने रविवारी पत्रकार परिषद घेतली होती (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

अग्निपथ योजनेला वाढत्या विरोधानतंर सरकारने या योजनेमध्ये काही बदल केले. सरकारने तरुणांच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न यातून केला.

    • अग्निपथ योजनेला वाढत्या विरोधानतंर सरकारने या योजनेमध्ये काही बदल केले. सरकारने तरुणांच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न यातून केला.

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात १४ जून रोजी अग्निपथ योजनेची (Agneepath Scheme) घोषणा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत पत्रकार परिषद घेत या योजनेची माहिती दिली होती. या योजनेबाबत देशातील तरुणांच्या मनात अनेक प्रश्न होते. योजनेला विरोध करत काही ठिकाणी भरतीची तयारी करणारे तरुण रस्त्यावर उतरले. त्यानतंर दोन दिवसांनी केंद्र सरकारने काही शंकांची उत्तरे दिली आणि योजनेत काही बदलही करण्यात आले. मात्र केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराने ही योजना रद्द केली जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. (Changes After protest Against Agneepath Scheme)

ट्रेंडिंग न्यूज

Archana express accident : धक्कादायक! धावत्या ट्रेनपासून वेगळे झाले इंजिन, ३ किमी अंतरावर जाऊन थांबले; मोठा अपघात टळला

ऑस्ट्रेलियात नाईट आऊटदरम्यान महिला खासदाराला ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, पोस्ट करत मांडली व्यथा

Viral News : विमानतळावर प्रवाशाच्या पँटमध्ये सुरू होती चुळबुळ! पोलिसांनी अटक करून तपासले असता निघाले साप

Viral News : लहान मुलाने गिळला एलईडी बल्ब! जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची पळापळ! वाचा

देशात या याजनोविरोधात अनेक संघटनांकडून भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. तरुणांचा सर्वाधिक विरोध हा ४ वर्षांच्या सेवाकाळाला आहे. तरुणांशिवाय नेत्यांनीही याला विरोध दर्शवला असून १८ व्या वर्षी नोकरी सुरू केल्यानंतर २२ व्या वर्षी तरुण बेरोजगार होतील. ४ वर्षानंतर काय असा प्रश्न विचारला आहे.अग्निपथ योजनेला वाढत्या विरोधानतंर सरकारने या योजनेमध्ये काही बदल केले. सरकारने तरुणांच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न यातून केला.

संरक्षण मंत्रालयात आरक्षण
अग्निवीर होण्याआधी तरुणांची नाराजी यासाठी होती की जर दरवर्षी २५ टक्के अग्निवीर सेवेत कायम करणार असतील तर उरलेल्या ७५ टक्के अग्निवीरांचे काय? त्यांनी पुढे काय करायचं? सरकारने यावर योग्य पात्रता पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नोकरीत १० टक्के आरक्षण दिलं जाईल. भारतीय सीमा सुरक्षा दल आणि इतर सिव्हिलियन पोस्ट तसंच १६ संरक्षण क्षेत्रातील विभागांमध्ये हे आरक्षण लागू असेल. माजी सैनिकांसाठी असलेलं आरक्षण वगळून आरक्षण असेल.

वयोमर्यादेत सूट
केंद्रीय गृह मंत्रालयाने १८ जून रोजी घोषणा केली होती की जेव्हा अग्निवीर ४ वर्षांच्या सेवेनंतर बाहेर पडतील तेव्हा केंद्रीय सशस्त्र बल आणि आसाम रायफल्समध्ये त्यांना १० टक्के आरक्षण देण्यात येईल. याशिवाय केंद्रीय सशस्त्र दल आणि आसाम रायफल्समध्ये अग्निवीरांना १० टक्के आरक्षण दिलं जाईल. याशिवाय केंद्रीय सशस्त्र दल आणि आसाम रायफल्समध्ये कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट दिली जाईल. अग्निवीरांच्या पहिल्या बॅचसाठी ही वयोमर्यादा ५ वर्षे असेल.

एक वर्षासाठी वयोमर्यादेत वाढ
अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी चिंता व्यक्त केली होती की गेल्या दोन वर्षात भरतीच झालेली नाही. त्यामुळे अनेकांना या भरतीमध्ये उतरता येणार नाही. अग्निपथ योजना जाहीर केली तेव्हा यासाठी वयोमर्यादा साडे सतरा ते २१ वर्षे अशी होती. विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर संरक्षण मंत्रालयाने ही मर्यादा एक वर्षासाठी वाढवण्याची घोषणा केली. यामुळे २०२२ च्या भरती प्रक्रियेत २१ ऐवजी २३ पर्यंत वयाची मर्यादा असणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कोणत्याही प्रकारची भरती झालेली नाही. यामुळे २०२२ च्या बॅचचे अग्निवीर वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत संरक्षण मंत्रालयात नोकरीसाठी अर्ज करू शकतील.

१२ वी पास सर्टिफिकेट
अग्निवीरांसाठी किमान शैक्षणिक पात्रता १० वी आहे. दहावीनंतर भरती झालेल्या अग्निवीरांच्या शिक्षणावर परिणाम होईल तसंच पुढे शिकण्याची अडचण होऊ शकते. यावर शिक्षण विभागाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलच्या माध्यातून १२ वी पर्यंत शिकण्याचा पर्याय दिला आहे. यासाठी आवश्यक ते बदल NIOS करणार आहे.

३ वर्षांचा विशेष पदवी अभ्यासक्रम
शिक्षण मंत्रालयाने अग्निवीरांसाठी ३ वर्षाचा विशेष कौशल्याधारित पदवी अभ्यासक्रम आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अग्निवीरांना ४ वर्षांच्या सेवाकाळात शिकवण्यात आलेल्या तांत्रिक कौशल्याला प्राधान्य दिलं जाईल. IGNOU सोबत मिळून हा अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. या कोर्समध्ये ५० टक्के क्रेडिट फक्त स्किल ट्रेनिंगसाठी मिळेल जे अग्निवीलांना सेवाकाळात शिकवण्यात आले आहे.