मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतीय लष्कराला मोठं यश! १८ तासात ७ दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय लष्कराला मोठं यश! १८ तासात ७ दहशतवाद्यांचा खात्मा

Jun 20, 2022, 09:09 AM IST

    • गेल्या १८ तासात ८ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. कुपवाडा आणि कुलगामामध्ये रविवारी सकाळपासूनच चकमक सुरू होती.
Indian Army (फोटो - एएनआय)

गेल्या १८ तासात ८ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. कुपवाडा आणि कुलगामामध्ये रविवारी सकाळपासूनच चकमक सुरू होती.

    • गेल्या १८ तासात ८ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. कुपवाडा आणि कुलगामामध्ये रविवारी सकाळपासूनच चकमक सुरू होती.

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) काल एका दिवसात भारतीय लष्कराने (Indian Anrmy) ७ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने (Security Forces) ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराकडून चकमकी झालेल्या परिसरार शोधमोहिम सुरू आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबाचे ४, जैशचे दोन दहशतवादी आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

लष्कराकडून कुपवाडा, पुलावामा, कुलगमामध्ये शोध मोहिम राबवण्यात आली. यावेळी कुपवाडाच्या लोलाबमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार करण्यात आले. तर डीएच पोरा कुलगाममध्ये जैशच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याशिवाय पुलवामात एका दहशतवाद्याचा खात्मा कऱण्यात आला.

लष्कराने काश्मीरमध्ये शोध मोहिम हाती घेतली असून दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. गेल्या १८ तासात ८ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे. कुपवाडा आणि कुलगामामध्ये रविवारी सकाळपासूनच चकमक सुरू होती.

कुपवाडा आणि कुलगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांसह सुरक्षा दलाने संयुक्त कारवाई सुरू केली. यानंतर रविवारी झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत एक पाकिस्तानी नागरिकसुद्धा ठार झाला होता. यानंतर आणखी एका चकमकीत तीन दहशतवादी ठार करण्यात आले.

पुलवामात शनिवारी एका पोलिसाची हत्या झाल्याची घटना घडली होती. पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह शेतात आढळला होता. दहशतवाद्यांकडून पोलिसाची गोळ्या घालून हत्या झाली होती. याआधीही गेल्या काही दिवसांमध्ये टार्गेट किलिंगचे प्रकार घडले आहेत. टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील मोहिम आणखी तीव्र केली आहे.

पुढील बातम्या