मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ‘अग्निवीरांना मिळणार भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षकाची नोकरी’; भाजपचे नेते विजयवर्गीय यांचे धक्कादायक वक्तव्य

‘अग्निवीरांना मिळणार भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षकाची नोकरी’; भाजपचे नेते विजयवर्गीय यांचे धक्कादायक वक्तव्य

Jun 19, 2022, 08:56 PM IST

    • भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अग्निवीरांना त्यांच्या निवृत्तीनंतर भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षकांची नोकरी दिली जाणार. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
कैलास विजयवर्गीय

भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अग्निवीरांना त्यांच्या निवृत्तीनंतर भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षकांची नोकरी दिली जाणार. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

    • भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अग्निवीरांना त्यांच्या निवृत्तीनंतर भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षकांची नोकरी दिली जाणार. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

Agneepath Scheme Protest केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला चांगलाचा विरोध होत आहे. विरोधकांनीही या योजनेविरोधात आंदोलने करायला सुरुवात केली आहे. दरम्यान सत्ताधारी ही योजना कशी चांगली हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तर विरोधक आंदोलकांची बाजू उचलून धरत आहेत. या दरम्यान अनेक बेताल वक्तव्यही केली जात आहे. असेच वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की अग्निवीरांना निवृत्ती नंतर भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षकाची नोकरी देण्यात येईल. त्यांच्या या वक्तव्याचा आम आमदमी पार्टीने समाचार घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

 

आम आदमी पार्टीचे प्रमुख तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजवर्गीय यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप केला. कैलास विजयवर्गीय यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यात विजयवर्गीय यांनी पत्रकारांशी बोलतांना एक वक्तव्य केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जर भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षक ठेवले जातील तर त्यात अग्निवीरांना प्राधान्य दिले जाईल. जर अग्निवीर त्यांच्या लष्करातील ४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्यावर त्यांना ११ लाख रुपये मिळतील. यानंतर त्यांना नोकरी हवी असल्यास भारतीय जनता पक्षांच्या कार्यालयात सुरक्षा रक्षकांची नोकरी दिली दिली जाईल.

त्यांच्या या वक्तव्यावर अरविंद केजरीवाल यांनी व्टिट केले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, देशातील युवकांचा आणि जवानांचा अपमान करू नका. देशातील युवक दिवस रात्र मेहनत करुन शारिरिक चाचण्या पास करतात. कारण त्यांना लष्करात संपूर्ण जीवन सेवा द्यायची असते. हे सर्व काही ते भाजप कार्यालयासमोर सुरक्षा रक्षकाची नोकरी करण्यासाठी करत नाहीत.

तर काँग्रेस पक्षानेही या बद्दल व्टिट केले आहे. कैलास विजयवर्गीय यांनी अग्निपथ योजनेबद्दल जे काही संशय निर्माण झाले आहे, त्याची पुष्टी दिली आहे. दिल्ली येथे जो सत्याग्रह पक्षामार्फत सुरू आहे, तो या प्रकारच्या मानसिकतेचा विरोध करतो. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही विजयवर्गीय यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे.

विभाग

पुढील बातम्या