मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Agneepath: भारत बंद! बिहारमध्ये भाजप कार्यालयांसह हिंदू नेत्यांच्या सुरक्षेत वाढ

Agneepath: भारत बंद! बिहारमध्ये भाजप कार्यालयांसह हिंदू नेत्यांच्या सुरक्षेत वाढ

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 20, 2022 01:14 PM IST

अग्निपथ योजनेविरोधात अनेक संघटनांकडून भारत बंदची हाक देण्यात आली असून यामुळे दिल्लीच्या सीमेवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

बिहारमध्ये भाजप कार्यालये आणि हिंदू नेत्यांची सुरक्षा वाढवली
बिहारमध्ये भाजप कार्यालये आणि हिंदू नेत्यांची सुरक्षा वाढवली (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

अग्निपथ योजनेच्या (Agneepath Scheme) विरोधात अनेक संघटनांकडून भारत बंदची (Bharat Bandh) घोषणा करण्यात आली आहे. यातच काही संघटनांनी दिल्लीच्या दिशेने जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी अलर्ट होत दिल्लीत (Delhi) येणाऱ्या सर्व रस्त्यांवर चेकिंग सुरु केलं आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. गुडगावपासून नोएडा ते दिल्लीपर्यंत सर्व सीमेवर अनेक रस्त्यांवर वाहनांच्या (Delhi Traffic Jam) रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये (Bihar) सुरक्षेच्या कारणास्तव १५ जिल्ह्यात १९ जून पासून २४ तासासाठी इंटरनेट बंद कऱण्यात आलं होतं. आता त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. रविवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर भारत बंदच्या आवाहनाच्या पोस्ट्स व्हायरल झाल्या होत्या. यानंतर बिहारच्या २० जिल्ह्यात आज रात्रीपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात येणार आहे.

अग्निपथ विरोधात आंदोलनाचा सर्वाधिक भडका बिहारमध्ये उडाला आहे. मोठ्या प्रमाणावर आंदोलकांनी रस्त्यावर येत अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी केली आहे. अनेक ठिकाणी दगफेक, रेल्वे जाळपोळीच्या घटनाही घडल्या. त्यानंतर राज्य सरकारने बिहारच्या १५ जिल्ह्यात इंटरनेट बंद केले होते. यात आता आणखी पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं.

बिहारमधील ज्या जिल्ह्यात जास्त हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत तिथे इंटरनेट बंद करण्याचा निर्णय काल सरकारने घेतला. सोशल मीडियावरून समाजकंटकांकडून अफवा पसरवल्या जात असल्या कारणाने हा निर्णय घेतल्याचं सरकारने म्हटलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोबाइल इंटरनेट सर्व्हिस, सर्व एसएमएस सेवा. डोंगलवरून पुरवण्यात येणाऱ्या सेवाही बंद केल्या आहेत.

पोलिसांकडून भाजप आणि हिंदुत्ववादी नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. याबाबत संबंधित नेत्यांना विचारणाही केली आहे. भाजपची ११ जिल्हा कार्यालये SSB कडे सोपवण्यात आली आहे. तसंच प्रत्येक कार्यालयाबाहेर एक सुरक्षा पथक तैनात करण्यात आले आहे. मध्य पूर्व रेल्वेच्या RPF सुरक्षा आयुक्तांनी जवानांना दंगलखोरांविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. तसंच सर्व जिल्हा पोलिस प्रमुखांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. दंगल करणाऱ्या आंदोलकांचे फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात पुरावे गोळा करा असंही आयुक्तांनी सांगितले आहे.

अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) संजय सिंग यांनी म्हटलं की, सुरक्षा पथकाला हाय अलर्ट देण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही पथके सज्ज आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या १५ तुकड्या असून बिहार पोलिसांच्या ३५ विशेष तुकड्या राज्यभरात तैनात केल्या आहेत. बिहारचे मुख्य सचिव अमिर सुभानी यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून विद्यार्थी संघटनांशी चर्चा केली जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या