मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bihar Political Crisis: बिहारच्या राजकारणात त्सुनामी! नितीश कुमार करणार 'खेला', भाजपचं सरकार जाणार?

Bihar Political Crisis: बिहारच्या राजकारणात त्सुनामी! नितीश कुमार करणार 'खेला', भाजपचं सरकार जाणार?

Aug 09, 2022, 01:03 PM IST

    • Nitish Kumar to meet Governor: भाजपशी झालेल्या मतभेदातून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.
Nitish Kumar (HT_PRINT)

Nitish Kumar to meet Governor: भाजपशी झालेल्या मतभेदातून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.

    • Nitish Kumar to meet Governor: भाजपशी झालेल्या मतभेदातून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.

Bihar Political Crisis: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार उलथवून सत्तांतर घडवून आणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा बिहारमध्ये गेम होण्याची शक्यता आहे. भाजपशी झालेल्या मतभेदातून बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. त्यामुळं बिहारमधील भाजपची सत्ता जाणार आहे. भाजपशी साथ सोडल्यानंतर नितीश हे राष्ट्रीय जनता दलासोबत पुन्हा घरोबा करण्याची चर्चा व्यक्त होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Chrome : गुगल क्रोममुळे व्हाल कंगाल! करोडो युजर्सना धोका; सरकारने दिल्या महत्वाचा सूचना, वाचा काय आहे प्रकरण

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी राज्यपालांकडं भेटीची वेळ मागितली आहे. दुसरीकडं राष्ट्रीय जनता दलाच्या गोटातही हालचालींना वेग आला असून तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांकडून पाठिंब्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. तेजस्वी यादव हे पाठिंब्याचं पत्र नितीश कुमार यांना देणार असल्याचं बोललं जात आहे.

संयुक्त जनता दलाचे नेते आर. पी. सिंह यांच्याशी भाजपशी जवळीक वाढली होती. त्यांनी अलीकडंच पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांना लक्ष्य केलं होतं. भाजपच्या पाठिंब्यामुळंच हे सगळं होत असल्याची नितीश कुमार यांची भावना झाली आहे. तसंच, भाजप बिहारमध्ये २०० जागा जिंकण्याची रणनीती तयार करत आहे. त्यासाठी अलीकडंच भाजपनं पक्षाच्या सर्व विभागांची बैठकही घेतली होती. नितीश कुमार यांना हे प्रचंड खटकलं होतं. आम्ही २४३ जागांची तयारी करतोय, अशी कडवट प्रतिक्रिया त्यावेळी संयुक्त जनता दलानं दिली होती.