मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pradeep Kurulkar : दहशतवादी विरोधी पथकाने पकडलेला संरक्षण दलाचा शास्त्रज्ञ पाकिस्तानातील गुप्तहेरांना परदेशात भेटला?

Pradeep Kurulkar : दहशतवादी विरोधी पथकाने पकडलेला संरक्षण दलाचा शास्त्रज्ञ पाकिस्तानातील गुप्तहेरांना परदेशात भेटला?

May 06, 2023, 12:22 AM IST

    • Pradeep Kurulkar : पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली एटीएसने डीआरडीओचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर याला अटक केली होती.
Pradeep Kurulkar DRDO (HT)

Pradeep Kurulkar : पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली एटीएसने डीआरडीओचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर याला अटक केली होती.

    • Pradeep Kurulkar : पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली एटीएसने डीआरडीओचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर याला अटक केली होती.

Pradeep Kurulkar DRDO : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला भारताच्या संरक्षण क्षेत्रातील संवेदनशिल माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एटीएसने डीआरडीओचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर याला अटक केली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने कुरूलकर हा विदेशात पाकिस्तानी गुप्तहेरांना भेटल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता तपासयंत्रणांनी कुरूलकरचे परदेश दौऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. एटीएसने याबाबतची माहिती पुणे जिल्हा व सत्र न्यायालयासमोर दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Rahul Gandhi : राहुल गांधी सुपर पॉवर कमीशन आणून राम मंदिराचा निर्णय बदलणार!, माजी काँग्रेस नेत्याचा दावा

Vande Bharat: जे कधी झाले नाही ते आता होणार, वंदे भारतच्या माध्यमातून भारत चीनचे वाढवणार टेन्शन, ते कसे काय?

Pilgrims from Amravati died: महाराष्ट्रातील चार भाविक पंजाबमध्ये भीषण रस्ते अपघातात ठार

Karnataka Sex Scandal : क्लिप व्हायरल झाल्यापासून महिला सोडतायत घर, पती करतायत प्रज्वल रेवण्णाशी संबंधांची चौकशी

आरोपी प्रदीप कुरूलकर याला महाराष्ट्रासह देशातील अन्य कुणी मदत केली का?, याची चौकशी एटीएसकडून केली जात आहे. आरोपी प्रदीप कुरूलकर हा डीआरडीओच्या महत्त्वपूर्ण पदावर होता, हनी ट्रॅपमध्ये फसल्यानंतर त्याने पदाचा गैरवापर करत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील संवेदनशिल माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवली होती. तसेच तो अनेकदा विदेशात पाकिस्तानी गुप्तहेरांना भेटल्याचा खुलासा महाराष्ट्र एटीएसने केला आहे.

प्रदीप कुरूलकर याच्या निवृत्तीला अवघे सहा महिने उरले होते, कुरूलकर पाकिस्तानी गुप्तचरांसोबत संपर्कात होता. पोलिसांनी त्याच्याकडून दोन स्मार्टफोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे. मेसेजच्या माध्यमातून त्याने संरक्षण क्षेत्रासंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानी इंटेलिजन्सला दिल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यानंतर आता आरोपी प्रदीप कुरूलकर याला एटीएसने अटक केली असून त्याची पुढील चौकशी केली जात आहे.