मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan : पाकिस्तानात हाय होल्टेज ड्रामा! इस्लामाबाद पोलिस इम्रान खानला करणार अटक

Imran Khan : पाकिस्तानात हाय होल्टेज ड्रामा! इस्लामाबाद पोलिस इम्रान खानला करणार अटक

Mar 14, 2023, 11:22 AM IST

    • Islamabad police may arrest Imran Khan today : पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे. इस्लामाबाद न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. इम्रान खान यांना जमान पार्क येथून अटक होण्याची शक्यता आहे.
Arrest Warrant Issued Against Pakistan Ex PM Imran Khan (REUTERS)

Islamabad police may arrest Imran Khan today : पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे. इस्लामाबाद न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. इम्रान खान यांना जमान पार्क येथून अटक होण्याची शक्यता आहे.

    • Islamabad police may arrest Imran Khan today : पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे. इस्लामाबाद न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. इम्रान खान यांना जमान पार्क येथून अटक होण्याची शक्यता आहे.

इस्लामाबाद : शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानात सध्या हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाने एका महिला न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी त्यांना अजामीन पात्र वॉरंट जारी केले आहे. यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर इम्रान खान यांना अटक करून २९ मार्च आधी न्यायालयात हजर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Karnataka Sex Scandal : क्लिप व्हायरल झाल्यानंतर महिला सोडत आहेत घर, पतीच विचारत आहेत प्रज्वल रेवण्णाशी तुझा…”,

ICSE ISC Result: सीआयएससीई बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीचं मारली बाजी!

10th Passed Job: दहावी उतीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख!

DK Shivkumar Viral Video: खांद्यावर हात ठेवल्याने डीके शिवकुमार संतापले, सगळ्यांसमोर कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली!

२० ऑगस्ट रोजी एफ-९ पार्कमधील एका रॅलीत न्यायदंडाधिकारी झेबा चौधरी आणि पोलिस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे. दिवाणी न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी तीन पानांचा निकाल जाहीर करत तसेच या प्रकरणी इम्रान खान न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

माजी पंतप्रधानांनी सुनावणीला हजर राहण्याऐवजी न्यायाधीशांसमोर हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. तसेच व्हिडिओ कॉन्फरनसिंग द्वारे न्यायालयात उपस्थित राहण्या संदर्भात त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळत त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिस एका विशेष हेलिकॉप्टरने त्याच्या लाहोर येथील निवासस्थानी पोहचले. मात्र, यावेळी पोलिसांना चुकवत खान हे आपल्या हजारोंच्या संख्येने असलेल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले होते. इम्रान खान यांची गेल्या एप्रिलमध्ये पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. इस्लामाबाद आणि लाहोरच्या पोलीस अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत त्यांना अटक करण्याचे ठरले. खान यांना अटक करण्यासाठी पोलिस दुसऱ्यांदा लाहोरमध्ये आले आले होते.

खान यांना दोन प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. लाहोरमध्ये खान यांनी रॅली काढली. या खटल्याच्या सुनावणीतून सूट मिळावी यासाठी माजी पंतप्रधानांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय इस्लामाबाद न्यायालयाने यापूर्वी राखून ठेवला होता. मात्र, खान ही न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्याने अखेर त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

विभाग