मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PMC : पुण्यातील रिक्षांचे ई रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी २५ हजारांचे अनुदान

PMC : पुण्यातील रिक्षांचे ई रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी २५ हजारांचे अनुदान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 14, 2023 10:07 AM IST

PMC subsidy for e rickshaw : पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी महानगर पालिकेने पुढाकार घेतला आहे. शहरात असणाऱ्या रिक्षांचे ई-रिक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी मनपा आता २५ हजारांचे अनुदान देणार आहे.

Rickshaw
Rickshaw

PMC subsidy for e rickshaw : पुणे शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ई वाहनांना प्राधान्य देण्यासाठी पुणे महानगर पालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. शरातील रिक्षांचे ई-रिक्षा करण्यासाठी महानगर पालिका २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहीती दिली. विक्रम कुमार म्हणाले, रिक्षाचे ई-रिक्षामध्ये रूपांर करण्यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यातील २५ हजार रूपये हे पुणे महानगरपालिकेकडून दिले जाणार आहे. तर उरलेली ६० टक्के रक्कम वाहन मालकाला द्यावी लागणार आहे. हे रिक्षा चार्ज करण्यासाठी पालिका शहरात चार्जिंगस्टेशन उभारणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.

शहरात मोठ्या प्रमानात वाहने असल्याने प्रदूषण वाढले आहे. दरम्यान, शहरातील अनेक रिक्षा या सीएनजीवर आहेत. सध्या सीएनजीचे दर देखील वाढले आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. यामुळे वाढत्या प्रदूषण कमी करण्यासाठी आणि राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार पुण्यात हा उपक्रम राबवण्यात येणार असून यासाठी महापालिकेकडून हे २५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याने रिक्षा चलकांना मोठा फायदा होणार आहे.

 

या सोबत पालिकेचा दुहेरी उद्देश देखील साध्य होणार आहे. शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी देखील महापालिकेकडून तीन चाकी आॅटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देण्यात आले होते.

 

IPL_Entry_Point

विभाग