मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ahmednagar : बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षांच्या मुलाला वाचवण्यात अपयश; साडेआठ तासानंतर मृत्यू

Ahmednagar : बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षांच्या मुलाला वाचवण्यात अपयश; साडेआठ तासानंतर मृत्यू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 14, 2023 09:42 AM IST

Ahmednagar borewell Accident News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एक पाच वर्षाचा मुलगा काल १५ फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी प्रयत्न केले. मात्र, तब्बल साडे आठ तासानंतर या मुलाचा मृत्यू झाला आहे.

५ वर्षीय चिमुकला बोअरवेलमध्ये पडला
५ वर्षीय चिमुकला बोअरवेलमध्ये पडला

अहमदनगर : अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डीत एक पाच वर्षांचा मुलगा हा १५ फुट बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पाच तुकड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. जेसीबीच्या साह्याने जमीन खोदुन या मुलाला बाहेर काढण्यात आले. मात्र, या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल साडे आठ तास हा चिमुकला बोअरवेलमध्ये अडकला होता.

सागर बारेला (वय ५) असं बोअरवेलमध्ये पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सागर हा ऊसतोड मजुराचा मुलगा आहे. या घटनेमुळे कोपर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. सागर हा सोमवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास बोअरवेलजवळ खेळत असताना येथील उघड्या बोअरवेलमध्ये तो पडला. ही बोअर १५ फूट खोल होती. सागर बोअरवेलमध्ये पडताच त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. मुलगा बोअरवेलमध्ये पडल्यानंतर कोपर्डीतील ग्रामस्थांना यांची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या ५ तुकड्या या घटणास्थळी पोहचल्या.

त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. जेसीबीच्या साह्याने जमीन खोडून सागरला भाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. . रात्री अडीच वाजेपर्यंत त्याला बोअरवेलमधून काढण्यासाठी बचावकार्य सुरु होते. दोन जेसीबीच्या सहाय्याने समांतर खोदकाम करण्यात आले. घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल यांच्यासह महसूल प्रशासन तळ ठोकून होते. मात्र रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले. मात्र, त्याचा मृत झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्यप्रदेशातील ऊसतोड मजूर कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगर कारखान्यात ऊस तोडणीसाठी आलेले आहेत. यातील बुधाजी बारेला या ऊसतोड मजुराचा पाच वर्षाचा सागर नावाचा मुलगा आहे. मुलाच्या मृत्युमुळे ऊसतोडीसाठी इथे आलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

IPL_Entry_Point

विभाग