मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chalisgaon Jalgaon : चाकूचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार; फरार आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Chalisgaon Jalgaon : चाकूचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार; फरार आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Jan 27, 2023, 06:48 PM IST

    • Chalisgaon Jalgaon Rape Case : तरुणीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Chalisgaon Jalgaon Rape Case (HT_PRINT)

Chalisgaon Jalgaon Rape Case : तरुणीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

    • Chalisgaon Jalgaon Rape Case : तरुणीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Chalisgaon Jalgaon Rape Case : रिलेशनशिपमध्ये असताना काढलेले अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चाळीसगावात एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीसह चाकूचा धाक दाखवून तरुणीचं अपहरण करून अत्याचार केल्याच्या घटनेनंतर आता पोलिसांनी आरोपीसह त्याला साथ देणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. किरण कोलते असं आरोपीचं नाव असून त्याला अटक करण्याची पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच जळगावात एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर चाळीसगावात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात मकोका कायद्यांतर्गत होणार कारवाई

Mumbai Accident : रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला ट्रकनं चिरडलं; मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील घटना

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील किरण कोलते या तरुणाचे चाळीसगावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. परंतु त्यांचं नातं तुटल्यानंतर संतापलेल्या किरणने आपल्या साथीदारांसह चाळीसगाव गाठत तरुणीला भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर तिला एका वाहनात बसवून औरंगाबादेत आणलं. प्रेमसंबंधावेळी काढलेले अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आणि चाकूचा धाक दाखवत तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी किरणने तरुणीला सिडको येथील बस स्टँडवर तरुणीला सोडून पळ काढला.

घाबरलेल्या तरुणीनं चाळीसगाव गाठत घडलेला सारा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी आरोपी किरण कोलते याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणात चाळीसगावातील मेहूणबारे पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळं औरंगाबादसह चाळीसगावात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण हे करत आहेत.