मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Apr 27, 2024, 06:59 PM IST

  • Woman Raped in Mira Road : मीरा रोड येथे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचे केस कापून तिला विद्रुप केले. त्यानंतर तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी सक्ती केल्याचा आरोप पाडितेने केला आहे.

तरुणीवर बलात्कार करून केस कापले

Woman Raped in Mira Road : मीरा रोड येथे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचे केस कापून तिला विद्रुप केले. त्यानंतर तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी सक्ती केल्याचा आरोप पाडितेने केला आहे.

  • Woman Raped in Mira Road : मीरा रोड येथे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचे केस कापून तिला विद्रुप केले. त्यानंतर तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी सक्ती केल्याचा आरोप पाडितेने केला आहे.

मीरा रोड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पीडितेची अश्लील छायाचित्रे काढून तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यानंतर आरोपींनी तिचे केस काढून तिला विद्रुप केले होते. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Update : अमरावतीत ऑरेंज अलर्ट; राज्यात काही भागात गारपिटीचा इशारा, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा उद्या निकाल?

Lok Sabha Election 2024 : महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी एकनाथ शिंदे नाशिकला रवाना!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता २६ वर्षाची असून ती मीरा रोड परिसरात राहते. गेल्यावर्षी ऑक्टोबर २०२३ मध्ये तिची ओळख कल्याणमधील मोहसीन शेख या २२ वर्षीय तरुणाशी झाली. तिने नया नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार मोहसीन याने पीडितेला बिर्याणीत गुंगीचे औषध घालून तिला खायला दिली होती. ही बिर्याणी खाल्ल्यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाली त्यानंतर मोहसीन याने तिच्यावर बलात्कार केला व तिची अश्लील छायाचित्रे काढली. हे फोटो दाखवून तो तिच्यावर वारंवार बलात्कार करत होता. त्यानंतर तो तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची सक्ती करू लागला. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी तिला मारहाण करू लागला व तिचे केस कापून तिला विद्रुप केली. तिच्याकडून वेळोवेळी पावणे तीन लाख रुपये उकळल्याचा आरोपही पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे..

आरोपी मोहसीन शेख याचे भाऊ जाफर, मोबिन, मेव्हणा अश्फाक शेख यांनी तिचा विनयभंग केला होता. काका इम्रान बागवान याने तिला मारहाण केली. आरोपी मोहसीन याची आई शहनाज हिने देखील इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला, अशी तक्रार पीडितेने तक्रारीत केली आहे. या तक्रारी वरून नया नगर पोलिसांनी ६ जणांविरोधात फसवून, बलात्कार, विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा