मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार?

SSC HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार?

May 10, 2024, 10:11 AM IST

    • Maharashtra Board Results 2024: महाराष्ट्र बोर्ड उद्या (शुक्रवारी, १० मे २०२४) इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे,

Maharashtra Board Results 2024: महाराष्ट्र बोर्ड उद्या (शुक्रवारी, १० मे २०२४) इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

    • Maharashtra Board Results 2024: महाराष्ट्र बोर्ड उद्या (शुक्रवारी, १० मे २०२४) इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

SSC, HSC 2024 Result Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत महाराष्ट्र बोर्डाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर परिक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in आपले गुण तपासू शकतात. महाराष्ट्र बोर्डाच्या नियमानुसार, परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधान पोर्शे कारने दोघांना चिरडले, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत झाली. तर, इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च या कालावधीत पार पडली. यावेळी बारावीच्या परीक्षेला एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यात ८ लाख २१ हजार ४५० मुले आणि ६ लाख ९२ हजार ४२४ मुलींचा समावेश होता. दहावीच्या परीक्षेत जवळपास १६ लाख विद्यार्थी बसले होते. यातील ३ लाख ६४ हजार ३१४ विद्यार्थी मुंबईतील आहेत.

Jalgaon Accident: जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

निकाल कसा पाहायचा?

- सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in/ mahahsscboard.in वर भेट द्यावी.

- येथे विद्यार्थ्यांना ‘MAHA SSC Result 2024’ किंवा ‘MAHA HSC Result 2024’ हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे.

- पुढे हॉलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.

- यानंतर निकाल तुमच्या समोर दिसेल.

- भविष्यातील संदर्भासाठी निकालाची एक कॉपी डाऊनलोट करून तुमच्या जवळ ठेवावी.

२०२३ मध्ये महाराष्ट्र एसएससीचा निकाल २ जून रोजी जाहीर झाला होता. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ४९ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकालाची टक्केवारी ९३.८३ टक्के होती.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या