मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  supreme court : सत्तासंघर्षांवरील सुनावणी आज पूर्ण होणार; आता निकालाची उत्सुकता

supreme court : सत्तासंघर्षांवरील सुनावणी आज पूर्ण होणार; आता निकालाची उत्सुकता

Mar 15, 2023, 07:00 AM IST

    • Maharashtra politics : सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. होळीच्या सुट्टीनंतर कालपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाकडून यावेळी युक्तिवाद सुरू असून राज्यपालांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती, तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही यावर आपली भूमिका मांडत आहेत.
Maharashtra politics

Maharashtra politics : सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. होळीच्या सुट्टीनंतर कालपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाकडून यावेळी युक्तिवाद सुरू असून राज्यपालांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती, तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही यावर आपली भूमिका मांडत आहेत.

    • Maharashtra politics : सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. होळीच्या सुट्टीनंतर कालपासून पुन्हा एकदा सलग सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाकडून यावेळी युक्तिवाद सुरू असून राज्यपालांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती, तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही यावर आपली भूमिका मांडत आहेत.

दिल्ली : राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टात दाखल असून यावर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजुंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यानंतर आता कोर्ट काय निकाल देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या प्रकरणातील सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी आज बुधवारी संपणार आहे. यामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठ आता निकालाची तारीख कधी जाहीर करणार या बाबत उत्सुकता लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

शिवसेनेत बंड होऊन राज्यात सत्ता बदल झाला. हा सत्ता बदल बेकायदेशीर असून या बाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. गेल्या ७ महिन्यांपासून या बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या वतीने मंगळवारी ज्येष्ठ वकील हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी व मिनदर सिंह यांनी युक्तिवाद केला. राज्यपालांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता बुधवारी युक्तिवाद करणार आहेत. ‘१०-१५ मिनिटांमध्ये मुद्दे मांडू’, असे मेहता यांनी सरन्यायाधीशांना सांगितले.

मेहतांनंतर ठाकरे गटाच्या वतीने प्रामुख्याने ज्येष्ठ वकील कपिल सिबल व अभिषेक मनू सिंघवी स्पष्टीकरणाचे मुद्दे मांडतील. ‘या प्रकरणाची सुनावणी बुधवारी संपवू,’ असे सरन्यायाधीशांनी सिबलांना सांगितले. सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्ण मुरारी, न्या. एम. आर. शहा आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होत आहे.

कपिल सिब्बल यांनी हे बंड बेकायदेशीर असल्यास फुटून गेलेले आमदार यांच्यावर पक्षांतर बंदी प्रमाणे करण्यात आलेली कारवाई बरोबर असून ही बंड घटनाबाह्य असल्याचे त्यांनी सांगितले. तर हरिष साळवे म्हणाले, उद्धव ठाकरेंना राजीनामा दिला तिथेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा विषय संपला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. सध्या हे प्रकरण पुस्तकी आहे. त्यामुळे जे आमदार १६ अपात्र झाले तोच मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर आहे. यात राज्यपालांची भूमिका योग्य होती. असे देखील ते म्हणाले. दरम्यान, दोन्ही युक्तवाद पूर्ण झाले असून आजच्या सुनावणीत न्यायालय काय बाजू मांडेल ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा