मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

May 06, 2024, 06:37 AM IST

    • Maharashtra Weather Update : राज्यात उन पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यात पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार आहे. तर काही जिल्ह्यात पावसाचा आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात उन पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यात पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार आहे. तर काही जिल्ह्यात पावसाचा आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    • Maharashtra Weather Update : राज्यात उन पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यात पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार आहे. तर काही जिल्ह्यात पावसाचा आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : हवामान राज्यात आज व पुढील काही दिवस उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज गोव्यात आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हवामान कोरडे राहील. तर पुढील दोन दिवस मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बीड, लातूर, नांदेडसह काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट व पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यात सोलापूर आणि अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दोन्ही जिल्ह्यात तापमान ४४.३ डिग्री सेल्सिअस ऐवढे होते.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यांमध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती मराठवाडा व लगतच्या भागावर आहे. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही आता मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत जात आहे. त्यामुळे आज गोव्याचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Uddhav Thackeray : भाजपाचा विजय झाल्यास चीनमध्ये फटाके फुटतील, उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांना टोला

मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सहा व सात तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. नांदेड व लातूर जिल्ह्यात ६ व ७ तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहतील. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भात ९ पर्यंत पावसाचा यलो अलर्ट

विदर्भात अकोला जिल्ह्यात पाच व सहा तारखेला तर चंद्रपूर जिल्ह्यात पाच तारखेला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सात तारखेला मेघ गर्जना, विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ९ मेपर्यंत मेघ गर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात असे असेल हवामान

पुणे आणि हवामान आजूबाजूच्या हवामानाचा परिसरात ७ मे पर्यंत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ११ मे पर्यंत आकाश मुख्यता निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुण्यात रविवारी तापमानात वाढ झालेली पाहायला मिळाली. पुण्यात ४०.३ डिग्री सेल्सिअस तापनाची नोंद झाली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या