मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 05, 2024 10:54 PM IST

Sharad Pawar Health Update : प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.कात्रज येथील नियोजित सभाही रद्द करण्यात आली आहे.

शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द
शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Sharad pawar Health Update : एक मोठी बातमी समोर आलीअसूनशरद पवार (Sharad pawar) यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे उद्याचे (सोमवार) सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या तोफा आज थंडावल्या. आज पवारांच्या दिवसभर सभा होत्या तसेत उद्याही अनेक सभा तसेच अनेक नियोजित कार्यक्रम होते. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आज बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. यावेळी सभेदरम्यान शरद पवार यांना काहीसा त्रास जाणवल्याने त्यांनी अवघ्या सहा ते सात मिनिटात आपले भाषण आटोपलं. यातच आता शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की,शरद पवार यांचे उद्याचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शरद पवार सध्या बारामतीतील त्यांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत आहेत. दुपारी सांगता सभा झाल्यानंतर ते गोविंद बागेत आले, यानंतर आज शरद पवार हे येथेच मुक्काम करणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवारांनी राज्यभरात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. संपूर्ण राज्यभर दौरे केले. सततचे कार्यक्रम आणि दौऱ्यांमुळे झालेल्या दगदगीमुळे त्यांना आता अस्वस्थ वाटतं असल्याचं सांगितले जात आहे.

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून शरद पवार व्यस्त होते. महाविकास आघाडीचे जागावाटप व सभा बैठकांच्या नियोजनात तेच केंद्रबिंदू राहिले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी ते पहिल्या टप्प्यापासून सतत दौरे करत आहेत. दोन दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी आपला घसा बसल्याचे सांगितले होते. मात्र, तरीही प्रचारसभा घेत त्यांनी पुढेही अनेक ठिकाणी सभा केल्या आहेत.

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहेबांचे उद्या ६ मे रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्या दिनांक ६ मे रोजी कात्रज येथील नियोजित सभाही रद्द करण्यात आली असून याची सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचंही सांगण्यात आलं आहे.

बारामतीच्या सभेतहीत्रास जाणवला -

दरम्यान, शरद पवार यांनी आज (रविवारी) बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभा घेतली. मात्र, येथील सभेतही त्यांनी मोजून ६ ते ७ मिनिटांत भाषण आटोपलं त्यांचा आवाज कातर होत होता. घसा बसल्याने शब्द नीट फुटत नव्हते. तरीही त्यांनी जनतेला आवाहन केलं.

IPL_Entry_Point