मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे एक भगवे वादळ; जाणून घेऊयात त्यांचा जीवन प्रवास

Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे एक भगवे वादळ; जाणून घेऊयात त्यांचा जीवन प्रवास

Jan 23, 2023, 09:24 AM IST

    • Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचं आज अनावरण करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती.
Balasaheb Thackeray

Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचं आज अनावरण करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती.

    • Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचं आज अनावरण करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती.

Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचं आज अनावरण करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती. बाळासाहेबांनी राजकीय व कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार अनुभवले. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी शिवसेना ही संघटना उभारली आणि वाढवली. या संघटनेनं लाखो मराठीजनांना एक आवाज दिला.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather update: राज्यात सूर्य आग ओकणार! मुंबई, ठाणे, सोलापूर येथे उष्णतेची लाट येणार! विदर्भात पावसाचा अलर्ट

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय प्रवास अनेक चढ उतरांचा होता. त्यांनी मराठी माणसांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले. त्यांच्या जन्म २३ जानेवारी १९२६ जी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील केशव सिताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे समाजसुधारक होते. राजर्षी शाहू महारांजांच्या सोबत त्यांनी समाजसुधारणेचे काम केले होते.

बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा कारकिर्दीची सुरवात १९५५ साली एक व्यंगचित्रकार म्हणून केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे. १९६० साली बाळासाहेब आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक हे राजकीय व्यंगचित्रण करणारे मासिक सुरू केले. त्यामाध्यमातून त्यांनी मराठी माणसाचे प्रश्न प्रामुख्याने मांडले.

१९ जून १९६६ साली प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना केली. मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना अशी या पक्षाची ओळख ठरली. भाजपसोबत शिवसेनेते १९८४ साली युती केली. त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेने भाजपच्या मदतीने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली.

१९८९ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाच्या हिताच्या आणि अधिकाराच्या गोष्टी मांडल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९२ मध्ये झालेल्या बाबरी मशिदीच्या झालेल्या पाडावाचं समर्थन त्यांनी केलं. बाबरीच्या पतनानंतर मुंबईत बॉंबस्फोट झाले आणि त्यानंतर धार्मिक दंगली उसळल्या. या दंगलीमध्ये शिवसैनिकांचा समावेश होता असा अहवाल श्रीकृष्ण समितीने दिला. ऐंशीच्या दशकात बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि आपल्या पक्षाचा विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलली. सुरुवातीच्या काळात दक्षिण भारतीयांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने नंतरच्या काळात उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली.

बाळासाहेब ठाकरे यांचा जीवांप्रवास हा संघर्षमय राहिला. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार अनुभवले. १९९५ साली शिवसेना भाजप युतीने महाराष्ट्रातील सत्ता काबिज केली. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी बसले. २००४ साली उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. ९ मार्च २००६ साली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर २००९मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. मे २०१२ मध्ये त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. १५ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र हळहळला.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा