मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena: शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाचा ? निवडणूक आयोग आज देणार फैसला, शिंदे-ठाकरे गटाचे भवितव्य ठरणार

Shivsena: शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाचा ? निवडणूक आयोग आज देणार फैसला, शिंदे-ठाकरे गटाचे भवितव्य ठरणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 17, 2023 07:26 AM IST

Shiv Sena Symbol : शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात आज निकाल लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आल्यामुळे ठाकरे गटाकडून निकाल द्या किंवा संघटनात्मक निवडणुकीची परवानगी मागितली आहे. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रे देखील सादर केली आहे.

Shiv Sena
Shiv Sena

Shiv Sena Symbol : राज्याच्या सत्ता संघर्षाबाबत आज महत्वपूर्ण सुनावणी आज चार वाजता निवडणूक आयोगापुढे होणार आहे. या सुनावणीत शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा हे ठरणार आहे. ही महत्वाची सुनावणी असल्याने सर्वांचे लक्ष या कडे लागून आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ या महिन्यात २३ तारखेला संपत आहे. दरम्यान, या राजकीय वाद मिटेपर्यंत त्यांना ठाकरे यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. यावर निवडणूक आयोग काय निकाल देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील सत्ता संघर्ष हा सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्यावर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी होणार आहे. मात्र, त्या आधी आज निवडणूक आयोगापुढे पक्ष नेमका कुणाचा या बाबत महत्वाची सुनावणी होणार आहे. या पूर्वी १० जानेवारीला सुनावणी झाल्यानंतर आज या प्रकरणी निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहे.

दरम्यान, या पूर्वी १० तारखेला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्न निर्माण केले होते. सुप्रीम कोर्टात प्रकरण असतांना ही सुनावणी आयोग घेऊ शकते की नाही याबाबत आधी निकाल मिळवा अशी विनंती त्यांनी केली होती. पण या प्रकरणाच्या वैधतेसह सर्व निकाल आम्ही एकत्रित देऊ असे आयोगाने म्हटले होते. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी, मणिंदर सिंह यांनी देखील या प्रकरणी युक्तिवाद करत ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्न उपस्थित केले होते. सादिक अली केसनुसार अशा वादावर निर्णयासाठी निवडणूक आयोग हेच एकमेव अथॉरिटी आहे असा युक्तिवाद करण्यात आला होता. आज सिब्बल यांचा युक्तिवाद होईल.

 

IPL_Entry_Point