मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेना व धनुष्यबाण कुणाचा?, निवडणूक आयोगाने दिली पुढची तारीख, पक्षप्रमुखपदाचा सस्पेन्सही वाढला!
पक्षप्रमुखपदाचा सस्पेन्सही वाढला!
पक्षप्रमुखपदाचा सस्पेन्सही वाढला!

शिवसेना व धनुष्यबाण कुणाचा?, निवडणूक आयोगाने दिली पुढची तारीख, पक्षप्रमुखपदाचा सस्पेन्सही वाढला!

23 January 2023, 15:17 ISTShrikant Ashok Londhe

thackeray Vs shinde Crisis : शिवसेना कुणाची व धनुष्यबाणावर कुणाचा हक्क यावर निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी पार पडली. मात्र आयोगाने दोन्ही गटांना लेखी उत्तर देण्याचे आदेश देत पुढची सुनावणी ३० जानेवारीपर्यंत स्थगित केली. आता पक्षप्रमुखपदाचा सस्पेन्सही वाढला आहे.

Maharashtra politics : शिवसेना कुणाची व पक्षाच्या धनुष्यबाणावर उद्धव ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा दावा योग्य यावर आज निवडणूक आयोगासमोर जवळपास साडेतीन तास सुनावणी पार पडली. ठाकरे आणि शिंदे गटाकडून आयोगासमोर जोरदार युक्तीवाद केला गेला. दोन्ही गटांनी ‘शिवसेना’ पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हावर दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगासमोरील युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असला तरी मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. निवडणूक आयोगाने सुनावणीसाठी ३० जानेवारी ही तारीख दली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुढची सुनावणी घेण्यापूर्वी दोन्ही गटांनी सोमवारी (२३ जानेवारी रोजी) याबाबत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दोन्ही गटांनी आयोगाला लेखी उत्तर सादर केल्यानंतर याप्रकरणी ३० जानेवारी रोजी पुढील सुनावणी घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे मूळ शिवसेना नेमकी कुणाची हा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ २३  जानेवारीला संपत आहे, त्यामुळे प्रतिनिधीसभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्या, किंवा पक्षप्रमुखपदाला मुदतवाढ द्या, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगापुढे केली. निवडणूक आयोगाने याबाबत काहीही निर्णय दिलेला नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख राहणार का? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

 एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व पक्षचिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि दोन्ही गटांनी वेगवेगळी निवडणूक चिन्हे दिली. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांकडून दावा कायम असून त्यातच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. मात्र निवडणूक आयोगाने काहीच निर्णय न देता पुढची तारीख दिली आहे.