मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Supriya Sule : उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे उत्तराधिकारी; सुप्रिया सुळे यांनी इतिहासच सांगितला!

Supriya Sule : उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे उत्तराधिकारी; सुप्रिया सुळे यांनी इतिहासच सांगितला!

Jan 19, 2023 04:56 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jan 19, 2023 04:56 PM IST

Supriya Sule on Balasaheb Thackeray Legacy : शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचे प्रमुख कोण यावरून एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत वाद सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रोखठोक भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं आहे. आता दुसऱ्या कोणी बाळासाहेबांच्या निर्णयाला चॅलेंज करणं हे हास्यास्पद आहे. आमच्यासाठी उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेससोबत मतभेद झाल्यानंतर आम्ही आमचं स्वत:चं वेगळं घर बांधलं. काँग्रेसच्या विचारांना आम्ही मानतो, पण आम्ही कोणाचा वारसा लाटण्याचा प्रयत्न केला नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना हाणला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp