मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLC Election: भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी; तिसरा उमेदवार जाहीर

MLC Election: भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी; तिसरा उमेदवार जाहीर

Jun 09, 2022, 01:54 PM IST

    • महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2022) अतिरिक्त उमेदवार जाहीर करण्याची स्पर्धाच लागली असून भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीनं शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांना उमेदवारी दिली आहे.
Maharashtra Vidhan Bhavan

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2022) अतिरिक्त उमेदवार जाहीर करण्याची स्पर्धाच लागली असून भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीनं शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांना उमेदवारी दिली आहे.

    • महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2022) अतिरिक्त उमेदवार जाहीर करण्याची स्पर्धाच लागली असून भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीनं शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांना उमेदवारी दिली आहे.

Shivajirao Garje in MLC Election: राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) तिसरा उमेदवार घोषित केला आहे. राष्ट्रवादीनं शिवाजारीव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. ते आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याने तरुणाचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांची उडाली तारांबळ

Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

विधान परिषदेच्या दहा रिक्त जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचे दोन उमेदवार सहज निवडून जाऊ शकणार आहेत. मात्र, छोटे पक्ष व अपक्षांची मतं वळवून महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी भाजपनं पाच उमेदवार जाहीर केले आहेत. तसंच, सहावा उमेदवार म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. काहीही करून महाविकास आघाडीची मतं फोडायची अशी भाजपची खेळी असल्याचं दिसतं.

भाजपच्या या खेळीला शह देण्यासाठी राष्ट्रवादीनंही कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. त्यांनी शिवाजीराव गर्जे या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. गर्जे हे राष्ट्रवादीचे कार्यालय प्रमुख असून पक्षाचं प्रशासकीय काम पाहतात. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आता दहा जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत.

काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठीच छोटे पक्ष व अपक्षांची मदत महाविकास आघाडीला लागणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी गर्जे यांना कसं निवडून आणणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे केवळ दबावाचं राजकारण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १३ जून आहे. त्यानंतरच नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे.

उमेदवारांची पक्षनिहाय यादी

भाजप: प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

शिवसेना: सचिन अहिर, आमशा पाडवी

काॅंग्रेस: चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस: रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवाजीराव गर्जे

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा