मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajya Sabha Election: शिवसेनेच्या विजयासाठी पवार कुटुंबीय मैदानात

Rajya Sabha Election: शिवसेनेच्या विजयासाठी पवार कुटुंबीय मैदानात

Jun 09, 2022, 10:39 AM IST

    • Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली असून सहावी जागा जिंकण्यासाठी भाजप व शिवसेनेनं जोर लावला आहे. शिवसेनेच्या मदतीसाठी खुद्द पवार कुटुंब मैदानात उतरलं आहे.
Sharad Pawar

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली असून सहावी जागा जिंकण्यासाठी भाजप व शिवसेनेनं जोर लावला आहे. शिवसेनेच्या मदतीसाठी खुद्द पवार कुटुंब मैदानात उतरलं आहे.

    • Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली असून सहावी जागा जिंकण्यासाठी भाजप व शिवसेनेनं जोर लावला आहे. शिवसेनेच्या मदतीसाठी खुद्द पवार कुटुंब मैदानात उतरलं आहे.

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना व भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. सहावी जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही मैदानात उतरली असून खुद्द पवार (Pawar Family for Shiv Sena) कुटुंब छोटे पक्ष व अपक्षांची मनधरणी करत असल्याचं चित्र आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपच्या दोन, शिवसेना एक, काँग्रेस एक व राष्ट्रवादी काँग्रेस एक अशा पाच जागा सहज राज्यसभेत निवडून जाणार आहेत. मात्र, सहाव्या जागेसाठी भाजप व शिवसेनेनं आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळं प्रचंड चुरस आहे. महाविकास आघाडीला आपली गरज असल्याचं लक्षात घेऊन छोटे पक्ष व अपक्षांनी ताणून धरायला सुरुवात केली आहे. त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत. मुख्यमंत्री स्वत: काही आमदारांना भेटत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे हे स्वत: वेगवेगळ्या पक्षांच्या गाठीभेटी घेत आहेत. शरद पवार यांनी काही पक्षांच्या नेत्यांशी फोनवरून चर्चा केली आहे.

अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारनं मुस्लिमांसाठी काय केलं, असा सवाल करत समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी राज्यसभा निवडणुकीपासून दूर राहण्याची घोषणा केली होती. मात्र, अजित पवार यांनी स्वत: त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना राजी केलं आहे. त्याशिवाय, शरद पवार यांनी अखिलेश यादव यांना फोन केल्याचंही सूत्रांकडून समजतं. त्यानंतर सप मतदानास तयार झाला आहे. अजित पवार हे शब्दाला जागणारे आहेत असं कौतुकही आझमी यांनी केलं आहे.

बहुजन विकास आघाडीची तीन मतं देखील राज्यसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत. हे लक्षात घेऊन शरद पवार यांनी स्वत: यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे.

त्याचवेळी, सुप्रिया सुळे यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराला मत देण्याची गळ घातली आहे. सुप्रिया यांच्या भेटीनंतर जोरगेवार हे मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीतही सहभागी झाले होते. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसनं एमआयएमशी देखील संपर्क साधला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या