मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vile Parle: विलेपार्लेत सात घरं नाल्यात कोसळली; धक्कादायक घटनेनं मुंबईत खळबळ, पाहा व्हिडिओ

Vile Parle: विलेपार्लेत सात घरं नाल्यात कोसळली; धक्कादायक घटनेनं मुंबईत खळबळ, पाहा व्हिडिओ

Sep 26, 2022, 09:36 AM IST

    • Home Collapse In Vile Parle : मेट्रोच्या कामामुळंच आमची घरं नाल्यात कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
Home Collapse Video In Vile Parle (HT)

Home Collapse In Vile Parle : मेट्रोच्या कामामुळंच आमची घरं नाल्यात कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

    • Home Collapse In Vile Parle : मेट्रोच्या कामामुळंच आमची घरं नाल्यात कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Home Collapse Video In Vile Parle : घराला तडे गेल्यानं मध्यरात्री सात घरं शेजारच्या नाल्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं विलेपार्लेतील इंदिरानगरमध्ये खळबळ उडाली आहे. या घरांमध्ये कुणीही नसल्यानं सुदैवानं यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. इंदिरानगरच्या झोपडपट्टी परिसरात ही घटना घडल्यानं बचाव पथकानं परिसरातील इतर लोकांना दुसरीकडे हलवलं आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीन, सेल्फी पॉईंटची सुविधा

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंबियांना दाखवा, हायकोर्टाचे आदेश

Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

vijay wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणी भाजप आक्रमक; विजय वडेट्टीवारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

याआधीच या सातही घरांना तडे गेलेले होते. त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून ही घरं कोसळणार असल्याची माहिती तिथं राहणाऱ्या लोकांना समजली होती. त्यामुळं या सातही घरात रात्री कुणीही झोपलेलं नव्हतं. परंतु अचानक मध्यरात्री कोसळलेल्या या सात घरांमुळं मुंबईत खळबळ उडाली असून प्रशासनानं तातडीनं मदतकार्य सुरू केलं आहे. ज्या लोकांची घरं नाल्यात कोसळली आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेनं नजीकच्याच एका हॉलमध्ये केली आहे. त्यामुळं आता घरंच नसल्यानं या सात कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

मेट्रोच्या कामामुळंच घडली दुर्घटना..

विलेपार्लेत घरं कोसळल्यामुळं तेथील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेचं खापर काही स्थानिकांनी नाल्याच्या कामावर फोडलं आहे तर काही लोकांनी या घटनेला मेट्रोचं काम जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या असल्यानं आता या प्रकरणावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा