मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दोन राजेंमध्ये उफाळला संघर्ष.. “टोलनाका चालविणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये..”, शिवेंद्रराजेंचा घणाघात

दोन राजेंमध्ये उफाळला संघर्ष.. “टोलनाका चालविणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये..”, शिवेंद्रराजेंचा घणाघात

Mar 28, 2023, 12:23 AM IST

  • Shivendra raje Vs udyanraje Bhosale : उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत आहे. या दोन राजेंमधील वाद पुन्हा उफाळला आहे.

दोन राजेंमध्ये पुन्हा संघर्ष..

Shivendra raje Vs udyanraje Bhosale : उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत आहे. या दोन राजेंमधील वाद पुन्हा उफाळला आहे.

  • Shivendra raje Vs udyanraje Bhosale : उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत आहे. या दोन राजेंमधील वाद पुन्हा उफाळला आहे.

Shivendra raje Vs udyanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra raje Bhosale) यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत आहे. या दोन राजेंमधील वाद पुन्हा उफाळला आहे. साताऱ्यातील गोडोली तळ्याच्या सुशोभिकरणावेळी खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. याला शिवेंद्रराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai crime : तरूणीवर बलात्कार करून केस कापून केले विद्रुप; धर्म परिवर्तनाची सक्ती केल्याचा आरोप

Weather update : येत्या २४ तासात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Onion Export: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ९९,१५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Mumbai-Pune Expressway Bus Fire: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी

शिवेंद्रराजे या राजघराण्यात जन्माला आलेच कसे? असा सवाल उदयनराजेंनी केला होता. मात्र टोलनाके चालवणारेच आणि अन्यायकारक या घरात कसे जन्माला आले? हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे, असं म्हणत शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जहरी टीका केली होती..

शिवेंद्रराजे म्हणाले की, उदयनराजेंनी कोणत्या संस्था काढल्या आणि किती लोकांचे संसार चालविले सांगावे. उदयनराजे नेहमी अजिंक्यतारा उद्योग समूहावर भ्रष्टाचाराबाबत बोलतात त्यांनी तेच तेच जूने तुण तुणे वाजवणं बंद करावं व समोरासमोर येऊन बोलावं. त्यांच्या त्याच त्याच डॉगलॉगला सातारकर वैतागले आहेत.

साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की, मी तर म्हणतो टोलनाका चालवणाऱ्यांचा जन्म राजघराण्यात कसा झाला. काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टोकाचे आरोप करत टीका केली होती. त्याला आज शिवेंद्रसिंहराजेंनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. छत्रपती घराण्यात जन्मलेल्यांनी टोलनाका चालवावा. लोकांकडून पैसे वसूल करावेत, हे कितपत योग्य आहे. पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे वसूली करणा-यांवर चाप लावत असतं. परंतु सध्या वेगळेच सुरु आहे असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंना लगावला आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अजिंक्यातारा सहकारी कारखाना उत्तम चालला आहे. अजिंक्यतारा कारखाना एका हंगामात २१३ कोटी रुपये शेतकऱ्यांना देतो. या कारखान्याची उलाढाल ३६० कोटींची आहे. शेतकऱ्यांची बिले पंधरा दिवसाच्या आत जमा केली जातात. सूतगिरणीत २०० हून अधिक कामगार कामाला असून तीन कोटी रुपये पगाराला आणि बोनसला २० लाख रुपये दिले जातात. असे असताना तुम्ही जिल्ह्याच्या अर्थकारणासाठी काय केले हे सांगावे. आपण काहीच केलेले नाही, त्यामुळे आपण अजिंक्य उद्योग समूहाच्या भ्रष्टाचाराचे जे तुणतुणे वाजवत आहात ते बंद करावे.

 

काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी म्हटलं होतं की, शिवेंद्रराजेंनी वेगवेगळ्या संस्था स्थापन करून लोकांचे पैसे लुबाडले. त्यांनी अजिंक्यतारा, अजिंक्यतारा बाजार समिती, महिला बँका, बँका, कुक्कुटपालन द्वारे पैसे खाल्ले. मला हे सांगतानाही कमीपणा वाटतो, लाज वाटते. हे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे?,' अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली होती.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा