मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  UdayanRaje Vs ShivendraRaje: 'कडेलोट'वरून दोन्ही राजेंमध्ये वाद; उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये जुंपली

UdayanRaje Vs ShivendraRaje: 'कडेलोट'वरून दोन्ही राजेंमध्ये वाद; उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये जुंपली

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 08, 2022 08:54 PM IST

खासदारउदयनराजे (UdayanRaje)आणिआमदारशिवेंद्रराजे (ShivendraRaje) यांच्यात रंगलेल्याकलगीतुऱ्याने जिल्ह्यातील राजकारण तापू लागलं आहे. जर मी पैसे खाल्ले हे सिद्ध झाले तर अजिंक्यताऱ्याच्या कडेलोटवर जाऊन मी उडी मारेन नाहीतर ज्यांनी आरोप केलेत त्यांनी उडी मारावी, असे आव्हानउदयनराजेंनीकेलंआहे.

उदयनराजे-शिवेंद्रराजे
उदयनराजे-शिवेंद्रराजे

सातारा – साताऱ्याच्या गादीचे छत्रपतींचे वंशज उदयनराजे (UdayanRaje) व शिवेंद्रराजे (ShivendraRaje)  यांच्यातील वाद जगजाहीर आहे. शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उदयनराजे यांनीही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपला जवळ केले होते. तरीही दोघांमध्ये वारंवार खटके उडत असतात. आता  सातारा नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन राजे आमने-सामने आले आहेत. 

खासदार उदयनराजे (UdayanRaje) आणि आमदार शिवेंद्रराजे (ShivendraRaje) यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याने जिल्ह्यातील राजकारण तापू लागले आहे. सातारा नगरपालिकेवर सध्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाची सत्ता आहे. त्यामळे निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत या आघाडीला सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन शिवेंद्रराजे यांनी केले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांचा सातारकर जनता अजिंक्यतारांवरून कडेलोट करेल, असा घणाघात सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंवर केला आहे. 

एक दिवसापूर्वी खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje) यांनी शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje) हे भ्रष्टाचारी असून  सातारकर  त्यांना दिशा दाखवतील, अशी टीका केली होती. याला पलटवार करताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही उदयन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. उदयनराजे कोणाचा कडेलोट करतील की नाही हे माहित नाही पण येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातारकर उदयनराजेंच्या आघाडीला धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत. नगरपालिकेतून शंभर टक्के उदयनराजेंचा कडेलोट होणार असे शिवेंद्रराजे म्हणाले. 

यावर सध्याचे विचारवंत लोकप्रतिनिधी आम्हालाच नावे ठेवतात, असे म्हणत खासदार उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला. तुमच्या जाहिरनाम्यात कास धरणाच्या उंचीत ज्यांचा साधा उल्लेख नव्हता त्या दादांनी पैसे दिले असे आपण सांगता ते दादा कोण? असा सवाल उदयन यांनी उपस्थित केला आहे. 

सातारा नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. यावेळी खासदार उदयनराजेंनी जोरदार फटकेबाजी करत निशाणा साधला होता. माझ्यावर पैसे खाल्ल्यांचा आरोप केला जात असताना मी पैसे खाल्ले असते तर राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा यांनी मला ठेवलं असतं का? असे म्हणत मी गैरकृत्य करत नाही आणि ते खपवूनही घेत नाही. मग ते कोणीही असुदे, तुम्ही ठिकाण निवडा जर मी पैसे खाल्ले हे सिद्ध झाले तर अजिंक्यताऱ्याच्या कडेलोटवर जाऊन मी उडी मारेन नाहीतर ज्यांनी आरोप केलेत त्यांनी उडी मारावी, असे आव्हान खासदार उदयनराजेंनी केले आहे.

IPL_Entry_Point